लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरली

लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरली 



नगरटुडे इफेक्ट 

 वेब टीम नगर : लसीकरण केंद्र कि कोरोना सुपर स्प्रेडर्स "लसीकरण केंद्रातील सावळा गोंधळ"  या मथळ्या खाली नगरटुडे या वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्यांची दखल घेऊन महा पालिकेने लसीकरण केंद्रांचे नियोजन बदलून याद्यांप्रमाणे अथवा टोकन सिस्टीमने लसीकरण करण्याचा निर्णय घेऊन गर्दी टाळण्याच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांमुळे लसीकरण केंद्रांवरील अनावश्यक गर्दी कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

कालच या संधार्बत विभागीय आयुक्त गोराक्षनाथ गाडीलकर यांनीं महानगर पालिकेत घेतलेल्या बैठकीत पुरे झली महानगरपालिकेची नाचक्की असे सुनावत लसीकरणाचे नीट नियोजन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाचे आयुक्त शंकर गोरे, महापौर बाबासाहेब वाकळे,सभागृह नेते रवींद्र बारस्कर,  आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे , आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोर्गे यांच्या सह  झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला         

आज सकाळी लसीकरण केंद्रांवर चक्कर मारल्यानंतर जिजामाता उद्यान येथे १२८ डोस,माळीवाडा केंद्रात ११० डोस,तोफखाना आरोग्य केंद्रात १०० डोस उपलब्ध झाल्याचे फलक लावण्यात आले होते. त्यानुसार यादीनिहाय अथवा टोकन प्रमाणे लसीकरण सुरु करण्यात आले तरीही थोडीशी गर्दी लसीकरण केंद्रांवर झाली मात्रया पुढील काळात लसीकरण सुरळीत पद्धतीत होऊ लागेल याची हि नांदी ठरेल. 

Post a Comment

0 Comments