कला ही एक संजीवनीच

कला ही एक संजीवनीच

फर प्राचीन काळापासून कला हे मानव जीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनलेले आहे. मानव हा बुध्दीचे लेणे लाभलेला प्रवृत्ती बुध्दिंग झाली आणि त्याच्या जीवनात अधिक ठामपणे द्दढमुल झाली. कलेचे जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कले मुळेच मानवी जीवन समृद्ध, संपन्न व आनंदमय बनविता येते त्याला अर्थप्राप्त होतो, ते जीवन जगावसे वाटते, आपल्या जीवनातून कला वजा केल्यास बाकी राहील ते केवळ पशुतुल्य आयुष्य. मनुष्याला कला स्वाद, कला आनंद लुटता यावा म्हणूनच भगवंताने खऱ्या अर्थाने त्यात अंतर्भाव निर्माण केले आहे.

कला म्हणजे विचार आणि भावना यांचे उत्स्फूर्त आणि सौंदर्यपूर्ण प्रकटीकरण, कला ही भगवंताचे दुसरे रूप आणि कलाकार हा त्याचा पुजारी, कला म्हणजे भाषा.

सध्या कोरोना महामारीने सर्वांचेच मानसिक आरोग्यच्या समस्या वाढल्या आहेत. नकारात्मक, विकृती, त्रासदायक स्वप्ने, कोरोनाची भीती, त्याच बरोबर ताणतणाव वाढल्याने चिंताग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे परीणाम मानवी मनावर जबरदस्त ताण निर्माण केला आहे. महामारी शारीरिक आरोग्यवर औषधे, लस आली आहे, मानसिक तणाव यावर औषध नाही असे म्हणतात येणार नाही, कला ही त्यावर अत्यंत प्रभावीत उपचार ठरते अगदी प्राचीन काळापासून मानसोपचार मध्ये चालत आले आहे.

प्रत्येक मुल जन्माला यायच्या अगोदर त्याच्या मातेकडून त्यावर गर्भ कला संस्कार झालेले असते त्यामुळे प्रत्येक मनुष्यामध्ये कुठली न कुठली कला देणगी लाभलेली असते. त्यात लपलेल्या कला कोणी हौस तर कोणी व्यवसायीक दृष्टीकोनातून आत्मसात करतात. कुठली कला प्रथम त्या कलाकाराला आत्म समाधान देत असे. आत्ताच्या ह्या महामारीच्या काळात आपण कुठलीही कला आपल्या आवडीनुसार जोपासा हे खुप गरजेचे आहे व आपल्या ताणतणावर ही एक संजीवनीच ठरु शकते.

आज अधुनिक काळात इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे, सहजतेने आपल्याला आवडत्या कलेची महिती, तसेच आॅनलाईन व्याख्यान मिळेल. संगीत, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, हस्तकला, कविता, तसेच बागकाम, बुद्धिबळ, वाचन, संग्रह छंद जोपासा,चिंतन, प्राणायाम इ. कला आत्मसात करावे.

कराओके सिस्टीमवर आपल्या आवाजात आपल्या आवडीचे गाणी गाऊन तर बगा, गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करून तर बगा, कागदाच्या तुकड्यावर चित्र काढून तर बगा, पण ते मला येईल का, जमेल का चिंता सोडा फक्त सुरूवात तर करा.

आध्यात्मिक बरोबर सांस्कृतिक कलांनी आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ते आनंददायी आणि मनोरंजक आहे. कलेने जगाची सौंदर्याचा धारणा ओळखू शकतो म्हणूनचं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कलाची भुमिका प्रचंड आहे.निश्चितच आपले नैराश्य दुर होईल व मन प्रसन्न, जीवन आनंदमय होईल. 

हेमंत दंडवते (कलाकार)

भाजपा सांस्कृतिक आघाडी

अहमदनगर (शहर-जिल्हा)

मो. नं ९८२२२१२७९४

Post a Comment

0 Comments