महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शहरातील 8 हॉस्पिटल मधून कोरोना उपचाराचे पैसै परत मिळणार : नितीन भुतारे

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून शहरातील 8 हॉस्पिटल मधून कोरोना उपचाराचे पैसै परत मिळणार : नितीन भुतारे

वेब टीम नगर :  महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना अजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना भरलेली बिले पैसे हे मनसे परत मिळवून देणार आहे. त्या करिता अहमदनगर शहारातील आठ हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना हि बिले परत मिळतील त्या करिता त्यांनी एक अर्ज भरून उपचार घेतलेल्या हॉस्पिटल मधील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील काम करणाऱ्या आरोग्य मित्रांकडे सदर टेबल वर अर्ज जमा करावा तसेच अर्जा सोबत हॉस्पिटल, लॅब, मेडिकल, सिटी स्कॅन, एमआरआय बिले तसेच आधार कार्ड,केशरी, पिवळे,पांढरे, शुभ्र रेशनकार्ड च्या झेरॉक्स प्रत जोडावी सर्व बिले जोडावित. उपचाादरम्यान ऑक्सीजन लेवल हि ९४ पेक्षा कमी अश्या रुग्णांनी अर्ज करावा.

अहमदनगर शहरातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेची आठ हॉस्पिटल त्यांची नावे खालील प्रमाणे

१) एशियन नोबेल हॉस्पिटल प्रेमदान चौक सावेडी

२) साईदीप हॉस्पिटल तारकपुर

३)स्वास्थ हॉस्पिटल अण्णाभाऊ साठे चौक लालटाकी

४) नाईक पेडीट्रिक हॉस्पिटल सावेडी

५)विखे पाटील मेमोरियल अँड मेडिकल कॉलेज विळद घाट

६) गरुड हॉस्पिटल अँड कॅंन्सर सेंटर

७) आनंदऋषीजी हॉस्पिटल सक्कर चौक कोठी रोड

८) अनभुले हॉस्पिटल प्रेमदान चौक सावेडी

रिक्षा चालकांना मिळणार मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली दीड हजार रुपयांची मदत

या हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मनसे भारलेल्या बिलांची रक्कम परत मिळवुन देणार अर्ज जमा करतांना आपली हॉस्पिटलच्या माध्यमातुन काही कारणे सांगून दिशाभूल केली जाऊ शकते त्यामुळे आपण अर्ज जमा करावा व त्याची अर्जाची झेरॉक्स प्रत वर पोहच घ्यावी व त्याची एक प्रत आमच्याकडे जमा करावी रुग्ण जर बाहेर गावी राहत असेल तर त्यांनी त्यांच्या अर्जाची पोहोच प्रत त्या तालुक्यातील मनसेच्या जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष यांच्याकडे जमा कराव्यात. अधिक माहिती साठी ७३०४६१२२१ या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments