लागो पाठ चौथ्या दिवशीही कोरोना बाधितांच्या आकड्यात घट
वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज २०० ने घट आल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले असून आता कोरोना बाधितांची संख्या काहीशी नियंत्रणात आली आहे.आज नोंद झालेल्या कोरोना बाधितांच्या संख्येत १४०८ बाधितांचा समावेश आहे.
गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात १४०८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ६४, राहता- ३२ ,श्रीरामपूर- ९४, संगमनेर - १३१, नेवासे- ३९, नगर तालुका- ७४,पाथर्डी -९२ ,अकोले - ११९, कोपरगाव - ८६ ,कर्जत - ४७, पारनेर -१७३, राहुरी - ८९, भिंगार शहर- १४,शेवगाव - १७२, जामखेड - ९२, श्रीगोंदे - ३९, इतर जिल्ह्यातील - ४६, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील - ०१ जणांचा समावेश आहे.
0 Comments