नगरकरांना काहीसा दिलासा

 नगरकरांना काहीसा दिलासा 

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा अंशतः घट झाली असून गेल्या आठवड्या भरापासून पासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. मात्र पहिल्यांदाच नगर शहरातली रुग्ण संख्येने पुन्हा शंभरी पार केली आहे.गेल्या २४ तासात २१९१ कोरोना बाधितांची नव्याने नोंद झाली आहे.  

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २१९१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १०८, राहता- १५८ ,श्रीरामपूर- ३२०, संगमनेर - १७१, नेवासे- १५९, नगर तालुका- १५५,पाथर्डी -२१९ ,अकोले - ४४, कोपरगाव - १२१ ,कर्जत - ५७, पारनेर -१५७, राहुरी - ७८, भिंगार शहर- ०७ ,शेवगाव - १५१, जामखेड - १०२, श्रीगोंदे - १५६, इतर जिल्ह्यातील - २६, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील - ०१ जणांचा समावेश आहे.   

Post a Comment

0 Comments