जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ तर लहान मुलांनाही कोरोनाची लागण

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत वाढ तर लहान मुलांनाही कोरोनाची लागण  

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा सुमारे ४०० नि वाढ झाली असून गेल्या आठवड्या भरापासून पासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. मात्र पहिल्यांदाच नगर शहरातली रुग्ण संख्या १०० च्या आत आली असून  गेल्या २४ तासात २२६३ कोरोना बाधितांची  नवताने नोंद झाली आहे.  

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २२६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- ८३, राहता- ८२ ,श्रीरामपूर- २२६, संगमनेर - २७०, नेवासे- १२६, नगर तालुका- १३१,पाथर्डी -१३० ,अकोले - १५९, कोपरगाव - ७१ ,कर्जत - १३०, पारनेर -१९५, राहुरी -११८, भिंगार शहर- ०२ ,शेवगाव - २०३, जामखेड - १३५, श्रीगोंदे - १८१, इतर जिल्ह्यातील - २०, मिलिटरी हॉस्पिटल -०१ आणि इतर राज्यातील - ०० जणांचा समावेश आहे.   

जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाची लागण होण्यास सुरवात झाली असून गेल्या ३६ तासांमध्ये ३७४ मुलांना कोरोना संसर्ग झाला आहे.तर त्यातील नगर तालुक्यातील बाळ रुग्णांची संख्या १५७ आहे.   

Post a Comment

0 Comments