सुशील कुमार फरारकाळात 'डॉन' शी संपर्क करून माफी मागणार होता

सुशील कुमार फरारकाळात 'डॉन' शी संपर्क करून माफी मागणार होता 

वेब टीम नवी दिल्ली : भारताचा ऑलिम्पिक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार  हा काही दिवस फरार होता आणि त्यानंतर त्याला शनिवारी अटक करण्यात आली. पण सुशील कुमार जेव्हा फरार होता तेव्हा तो एका डॉनला संपर्क करु इच्छित होता. या सर्व गोष्टीमुळे आता या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.

सुशील कुमार हा तब्बल १८ दिवस फरार होता. या १८ दिवसांमध्ये सुशील कुमार हा संदीप उर्फ काला जेठडी या डॉनला संपर्क करू इच्छित होता. संदीप हा उत्तर भारतामधील एक मोठा गँगस्टर आहे आणि सध्याच्या घडीला तो दुबईमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. सुशील कुमारकडे इलेक्ट्रॉनिक डिवाइस होते आणि त्यामुळे तो पकडला जाऊ शकतो, हे त्याला माहिती होते. पण तरीही एका डोंगलच्या माध्यमातून तो इंटरनेट सुरु करत होता आणि संदीपला कॉल करण्याचा प्रयत्न करत होता. कारण संदीपकडून त्याला माफी मिळू शकेल.

सुशील कुमार आणि त्याच्या साथीदारांनी जेव्हा सागर या युवा कुस्तीपटूला मारहाण केली तेव्हा त्याच्याबरोबर सोनू नावाचा एक मुलगा होता. सुशील कुमारच्या साथीदारांनी यावेळी सोनूलाही मारहाण केली होती. सोनूच्या नावावर हत्या, मारहाण आणि अनेक गुन्हे दाखल आहेत. सोनू हा संदीपचा पुतण्या आहे. या सर्व प्रकरणानंतर सोनूला झालेली मारहाण हा सुशील कुमारसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा होता. कारण सानूचा थेट संपर्क हा संदीपबरोबर होता.

दिल्ली पोलिसांनी याबाबत सांगितले की, " जेव्हा सुशील कुमारला अटक करण्यात आली होती, तेव्हा त्याला सागरच्या मृत्यूची जास्त भिती नव्हती. पण संदीपची लोकं त्याला जेलमध्ये मारु शकतात, ही भिती त्याला सतावत होती. त्यासाठीच दोन आठवडे तो संदीपशी संपर्क करू इच्छित होता आणि त्याच्याकडून त्याला सोनूला मारहाण केल्याप्रकरणी माफी हवी होती. पण या १८ दिवसांच्या कालावधीमध्ये सुशीलचा संदीपशी संपर्क होऊ शकला नाही, असे म्हटले जात आहे."

Post a Comment

0 Comments