प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध करत आंदोलन

प्रशासनाच्या आडमुठे धोरणाचा निषेध करत आंदोलन 

वेब टीम नगर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा रुग्णालय प्रशासनाने घेतलेल्या अडमुठ्या धोरणाचा फटका येथील आरोग्य कर्मचा-यांनाच याबसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱ्यांनी आज सकाळीच रुग्णालयाच्या गेटवरच आंदोलन केले.

सध्या येथे कोविड रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांचे नातेवाईक व इतर नागरिक येत असल्याने हॉस्पिटलमध्ये व आवारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात होती. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या गेटच्या आत वाहने आनण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे मोटारसायकल गेटच्या बाहेर रस्त्यावरच लावुन रुग्णालयात प्रवेश दिला जात आहे. परंतु यामुळे येथील कर्मचाऱ्यांना  देखील त्यांची वाहने बाहेर उभी करावी लागत आहेत. या दरम्यान अनेकांची वाहने चोरी जात आहेत.   अनेकांकडून दंड  देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे या संतप्त कर्मचाऱ्यांनी याला जबाबदार कोण ? असा सवाल करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

Post a Comment

0 Comments