सुजित झावरे पाटील यांनी केलेला "होम" योग्यच - रघुनाथ आंबेडकर

सुजित झावरे पाटील यांनी  केलेला "होम" योग्यच - रघुनाथ आंबेडकर 

वेब टीम पारनेर : तालुक्यात सुजित पाटील झावरे यांनी जे कोविड सेन्टर उभारले आहे ते अभिमानास्पद आहे आणि त्याही पलीकडे जे कोविड सेन्टर पासुन दूर अंतरावर केलेला " होम हवन " हा हिन्दु धर्माला साजेसाच  आहे.  कारण या पुर्वी ही राजे महाराजे महामुनी "होमहवन" करत असायचे हा हिन्दु धर्मातील शास्ञ शुद्ध विधी आहे. याचे मी हिन्दु म्हणुन समर्थन करतो , कारण जे हिन्दु आहेत तेच हा विधी करतात, ज्यांना कोणाला हे वाईट वाटत असेल हा त्यांचा "दोष" आहे असे मत नरेंद्र मोदी आर्मी पारनेर तालुकाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी व्यक्त करत ते सुजित झावरे पाटील यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

वास्तविक पाहता  या मध्ये काँग्रेसच्या नेत्यांना नाक खुपसण्याची गरज नाही . कारण हा हिन्दुस्थान आहे.आणि राज्यघटने प्रमाणे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंञ्य आहे .इतर कोविड सेन्टर मध्ये काय धिंगाणा चालतो याचा  प्रथम काँग्रेसच्या पुढार्यांनी अभ्यास करावा आणि मग सुजित पाटलांन वर लक्ष केद्रीत करावा ? आता  "राजकारणात" कसं  झाल आहे ?  आपल ते " बबड "आणि

दुसर्याच ते "कारट  " ?  या कडे काँग्रेसच्या  पुढार्यांनी लक्ष केद्रीत करावे असा टोलाही  आंबेडकर यांनी मारला  आहे .

Post a Comment

0 Comments