लॉरेन्स स्वामी व त्याच्या साथीदारांवर विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

लॉरेन्स स्वामी व त्याच्या साथीदारांवर  विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल 

वेब टीम नगर : शहरातील भिंगार येथील रहिवासी तसेच गुन्हेगारी टोळीच्या गुंड लॉरेंसस्वामी  त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. 

 भिंगार येथील टोल नाक्यावर जाऊन लॉरेन्स स्वामी व त्याच्या साथीदाराने संबंधित नाका चालकाला खंडणीची मागणी केली जर आम्हाला दर महिन्याला हप्ता दिला नाही तर नाका हात तोडून टाकू असा दम सुद्धा दिला होता या प्रकरणात संदर्भामध्ये भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या घटनेचा तपास तात्काळ करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पोलिसांना दिले होते या घटनेचा भिंगार कॅम्प पोलिसांनी तपास करून लॉरेन्स स्वामी व त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी त्या वेळेला अटक केलेली होती लॉरेन्स  स्वामी याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांमध्ये याअगोदर सुद्धा आणि गुन्हे दाखल होते सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्यावर पुढील कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्यानुसार लॉरेन्स  स्वामी याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता तडीपारी बरोबरच मोक्कांतर्गत कारवाई सुद्धा करण्याची तयारी त्यावेळेला पोलिसांनी केलेली होती.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२० नोव्हेंबर २०२० रोजी रात्री ९.३० वा अहमदनगर छावणी परिषद वाहन प्रवेश कर नाक्याजवळ सोलापूर महामार्गाच्या ठिकाणी साइड पटटीच्या सार्वजनिक ठिकाणी आरोपी संदिप ऊर्फ म्हम्या शरद  शिंदे, विक्रम आनंदा गायकवाड, बाबा ऊर्फ भावसाहेब सोपान आढाव, संदिप परशुराम वाघचौरे, प्रकाश दशरथ भिंगारदिवे, अर्जुण सवाजी दुबे यांनि आरोपी लॉरेन्स दौराई स्वामी यांच्या सांगण्यावरुन सदर प्रवेश नाक्याजवळ जावून नाका आमच्या हद्दीत येतो, आम्हाला हप्ता दे. नाका तोडून दे असे बोलून नाक्यावरील कर्मचारी यांना जखमी करुन नाक्यावर जमा झालेली ४ लाख ६ हजार ४७० रुपये रक्कम बळजबरीने घेतले. या फिर्यादीवरुन कॅम्प पोलीस स्टेशन भिंगार येथे गुर २८२७/२०२० भादवि कलम ३९५,३९७,३२४, ३२३,५०४,५०६ (२). १२०(ब) सह आर्म अॅक्ट कलम ४/२५ प्रमाणे दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयातील आरोपी विरुद्ध या पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याने व सदर गुन्हयाचा मास्टर माइंड आरोपी लॉरेन्स दोराई स्वामी हा असल्याने पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली  विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना अहवाल सादर करुन त्यांचेकडून महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३(१)(IT), (३)(२),३(४) प्रमाणे कलम वाढविण्याची परवानगी मिळाल्याने सदर गुन्हयाचा प्राथमीक तपास सुदर्शन मुंडे उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांनी केला. त्यानंतर सदर गुन्हयाचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे आदेशान्वये  अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत उपविभाग यांनी करुन त्यांनी सदर गुन्हयातील आरोपींना अटक करुन सबळ पुरावे उपलब्ध केले, सदर गुन्हयाचे कागदपत्र अपर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई (कायदा व सुव्यवस्था) यांचेकडे सदर गुन्हयातील आरोपी विरुद्ध मोक्कू कायदयान्वये परवानगी मिळवण्यासाठी कागदपत्र पाठवून त्यांची परवानगी दिल्याने सदर गुन्हयातील अटक व फरार आरोपी संदिप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे, विक्रम आनंदा गायकवाड (फरार ३) बाबा ऊर्फ भावसाहेब सोपान आढाव (फरार), संदिप परशुराम वाघचौरे, प्रकाश दशरथ भिंगारदिवे, अर्जुन सवाजी दुबे, बाळासाहेब रमेश भिंगारदिवे (फरार), लॉरेन्स दोराई स्वामी यांचे विरुद्ध विशेष न्यायधीश मोक्का न्यायालय अहमदनगर यांचे न्यायालयात दि. २० मे २०२१ रोजी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. 

जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी सदर गुन्हयाचा तपास केला. तपासात पोलीस उपनि पंकज शिंदे, सफौ डी. डी. शिंदे, सफौ आर.एस. भालसिंग, पोहेकाॅ एस एस सुपकर, पोना एम. डी. मगर यांनी या कामी मदत केली.


Post a Comment

0 Comments