कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने दिलासादायक चित्र
वेब टीम नगर : जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा ६३६ नि घट आली असून गेल्या ३ - ४ दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. आज जिल्ह्यात १८५६ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने काहीसे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात १८५६ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १२६, राहता- ८६ ,श्रीरामपूर- १४८, संगमनेर - ३५४, नेवासे- ९२, नगर तालुका- ९५,पाथर्डी -११६ ,अकोले - २०४, कोपरगाव - ६९ ,कर्जत - ९१, पारनेर -११६, राहुरी -१८५, भिंगार शहर-०१ ,शेवगाव - ४७, जामखेड - २८, श्रीगोंदे - ७६, इतर जिल्ह्यातील - २२, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील -०० जणांचा समावेश आहे.
0 Comments