जखणगाव हनीट्रॅप प्रकरणात बाळ बोठे यास सहआरोपी करावे : ॲड. सुरेश लगड

जखणगाव हनीट्रॅप प्रकरणात बाळ बोठे यास सहआरोपी करावे : ॲड. सुरेश लगड 

वेब टीम नगर : रेखा जरे  हत्याकांडातील मुख्यसूत्रधार बाळ बोठे याने पारनेर उपकारागृहातून लावलेले फोन आणि जाखणगाव येथील हनीट्रॅप यांचा आपसात संबंध दिसून येत असल्याने बाळ बोठे यास याप्रकरणात सहआरोपी करावे अश्या मागणीचे निवेदन ज्येष्ठ विधीज्ञ् सुरेश लगड यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे 

निवेदनात म्हटले आहे की, नगर तालुक्‍यातील जखणगांव येथील हनी ट्रॅप करणारे टोळीचा आपल्या अधिपत्याखालील नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र सानप व त्यांचे सहकारी पोलीसांनी पर्दाफार्श केल्यानंतर यात पोलीस तपासात निष्पन्न झालेल्यांचे अनेक गैरकृत्य समोर आलेले आहेत.पैशाचा  मोह व गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुणांना हेरून यातील या आरोपी महिलेने स्वतःची एक टोळीच तयार करुन तीच्या बंगल्यात आलेल्या पुरुषाचे अश्लील व्हीडीओ चित्रीकरण करुन त्यांना धमकावुन व मारहाण करुन त्यांचेकहुन पैसे उकळल्याची अतिशय धक्कादायक बाब पोलीस तपासात निष्पन्न झालेली आहे.

या गुन्हयाचा तपास करतांना नगर येथील बहुचर्चीत रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे याने यापुर्वी हनी ट्रॅप मालिका एका दैनिक वर्तमानपत्राने  अनेक भागात प्रसिध्द केलेली होती व त्या मालिकेत भरडल्या गेलेल्या अनेक व्यक्तींचे नावाचा अप्रत्यक्ष उल्लेख केलेला होता.तर या बाळ बोठेचा आत्ताच्या जखणगांव येथील घडलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाशी काही संबंध  आहे का या अनुषंगाने पोलीसांनी अटक आरोपी कडून,फिर्यादी कडून व साक्षीदाराकडून खोलवर चौकशी  करुन तसेच आरोपींचे फोन कॉल रेकॉर्ड गोळा करुन त्यात या बाळ बोठेचा सहभाग निष्पन्न झाल्यास पोलीसांनी त्या बाळ बोठेला सह आरोपी करावे अशी  विनंती वजा मागणी मी आपणाकडे समाज हितार्थ करीत आहे.एवढेच नव्हे तर दोनही हनी ट्रॅप प्रकरणात शिकार झालेल्यांनी न संकोचता पुढे येऊन अश्या नालायक अपप्रवृत्ती विरुद्ध  लेखी फिर्याद नोंदवावी अशीही माझी विनंती आहे.

तसेच पारनेर उपकारागृहात असतांना कैदयाकडे सापडलेल्या मोबाईलवरुन पत्रकार बाळ बोठे यांनी कॉलींग केल्याचे नुकतेच उघड झाल्याने बाळ बोठेसह इतर सात व्यक्‍ती विरुध्द पारनेर पोलीसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.याबाबत या कलाकार बाळ बोठेंनी कारागृहातुन कोणाकोणाला फोन केले ? व त्या बाळ बोठेचा फोन करण्याचा उद्देश काय ? एकतर बाळ बोठे खूना सारख्या गंभीर गुन्हयात मुख्य सुत्रधार आरोपी आहे.त्याने उपकारागृहातुन मोबाईलचा गैरवापर करण्याचे मागे त्यास नेमके काय साध्य करावयाचे होते ?  त्याने ज्यांना फोन केले त्यांचीही चौकशी  करावी मग ते वकील असोत अथवा अन्य कोणीही असोत याची सविस्तर चौकशी करावी  तसेच तपासी अधिकारी पारनेर यांनी उपकारागृह पारनेर चे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन घ्यावेत असेही या निवेदनात म्हटले आहे. 

Post a Comment

0 Comments