जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत १६०० ने वाढ

 जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत १६०० ने वाढ 

 वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येने कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा उसळी मारली असून कोरोना बाधितांच्या संख्येत पूर्वीपेक्षा  १६१८ इतकी बाधितांची वाढ आली आहे.आज जिल्ह्यात ३७७९ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.संगमनेर,नेवासे,शेवगाव, श्रीगोंदे आदी भागातुन कोरोना बाधितांची मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. नगर शहरातून ६० रुग्णांची वाढ झाली आहे.    

 

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात ३७७९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १९०, राहता-२६४ ,श्रीरामपूर-१६८, संगमनेर - ६१७, नेवासे- ४०२, नगर तालुका-२६४,पाथर्डी -१९२ ,अकोले - २५०, कोपरगाव -१४१ ,कर्जत - १७१, पारनेर -३१७, राहुरी -१७१, भिंगार शहर-१२ ,शेवगाव -२३४, जामखेड - ११०, श्रीगोंदे -२०९, इतर जिल्ह्यातील -६१, मिलिटरी हॉस्पिटल -०५ आणि इतर राज्यातील -०१ जणांचा समावेश आहे.       

दरम्यान पोलीस उपाधिक्षकांनी व महापालिकेने शहरात ३ ते ४ ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची आर टी पी सी आर टेस्ट करण्याची शक्कल लढवल्याने. शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. आज दस्तूरखुद्द पोलीस अधीक्षकच पाहणी करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले.  

Post a Comment

0 Comments