विनाकारण फिरणाऱ्याची अँटीजेन टेस्ट सुरू
वेब टीम नगर : जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार नगर शहरात पोलिस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आता विनाकारण फिरणार्यांकडून दंड वसूल करतानाच त्यांची रस्त्यावरच अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे.
सोमवारी सकाळीच दिल्लीगेट येथे पोलिसांनी तपासणी केंद्र सुरु केले. पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे तसेच अन्य पोलिस अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. येणार्या जाणार्या प्रत्येक वाहनचालकाला थांबवून सबळ कारण नसल्यास अँटीजेन टेस्ट करण्यात येत होती. शहरात करोनाचा आलेख काही प्रमाणात कमी होत असला तरी गर्दीमुळे तो पुन्हा वर जावू शकतो. हीच बाब लक्षात घेवून शहरात ठिकठिकाणी अँटीजेन तपासणी पोस्ट सुरु करण्यात आले आहेत.
0 Comments