कोरोना बाधितांच्या संख्येत दिलासादायक घट

कोरोना बाधितांच्या संख्येत दिलासादायक घट 

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्या कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा कमी झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येत कालपेक्षा ४७३ ची घट आल्याने मोठाच दिलासा मिळाला आहे. आज जिल्ह्यात २७११ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २७११ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- २५०, राहता-२१६,श्रीरामपूर-१९६, संगमनेर- २५६, नेवासे- ९५, नगर तालुका-२६८,पाथर्डी -९२ अकोले -२७५, कोपरगाव -१७६,कर्जत -१३१, पारनेर -२४४, राहुरी -१६८, भिंगार शहर-१२ ,शेवगाव -६६, जामखेड -६२, श्रीगोंदे -१३५, इतर जिल्ह्यातील -६३, मिलिटरी हॉस्पिटल -०४ आणि इतर राज्यातील -०२ जणांचा समावेश आहे.       

Post a Comment

0 Comments