लग्नानंतर अवघ्या पाच तासात नववधूचा मृत्यू

लग्नानंतर अवघ्या पाच तासात नववधूचा मृत्यू 

वेब टीम पाटणा : बिहारमधील मुंगेर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या पाच तासांनी नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना इथे घडलीय. काही तासांपूर्वी लग्नमंडपात पत्नीसोबत सात फेरे घेतलेल्या वरानेच  आपल्या पत्नीवर अंत्यस्कार करत तिला मुखाग्नि दिला. मिळालेल्या माहितीनुसार आठ मे रोजी निशाचं महकोला गावातील रवीश या मुलाशी लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर या तरुणीची तब्बेत आचानख खालावली. अनेक प्रयत्न करुनही या मुलीला वाचवण्यात नातेवाईकांना यश आलं नाही. भागलपुरमधील एका खासगी रुग्णालयामध्ये या नवविवाहितेने लग्नाच्या दिवशीच शेवटचा श्वास घेतला.

काही तासांपूर्वी जी मुलगी लग्नासाठी गावातून गेली आणि थेट तिच्या मृत्यूची बातमी आल्याने मुलीच्या गावातील लोकांनाही मोठा धक्का बसला. मुंगेर येथील मुख्यालयापासून ५० किलोमीटरवर असणाऱ्या तारापूर प्रभागातील अफजल नगर पंचायतअंतर्गत येणाऱ्या खुदिया गावामध्ये लग्नानंतर पाच तासांमध्येच मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. ८ मे रोजी येथील रंजन यादव यांची मुलगी निशा कुमारीच्या लग्नानिमित्त घरामध्ये अगदी आनंदाचं वातवरण होतं. त्याच दिवशी सायंकाळी येथे निशाच्या मृत्यूची बातमी मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. 

करोना नियमांमुळे हवेली खडगपूर येथील महकोला गावातील रहिवाशी असणाऱ्या सुरेश यादव त्यांचा मुलगा रवीश आणि मोजक्या नातेवाईकांसोबत लग्नसाठी निशाच्या गावी आले होते. नियोजित वेळेत लग्न लागलं. दोघांनी सप्तपदी घेतल्या, त्याने तिच्या माथ्यावर सिंदूर लावला आणि त्यानंतर काही वेळातच निशाची तब्बेल खालावली. तातडीने निशाला तारापुर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रावर नेण्यात आलं. निशाची प्रकृतीपाहून तिला भागलपुरला हलवण्यात आलं.

भागलपुरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निशाचा मृत्यू झाला. लग्नानंतर अवघ्या पाच तासांमध्ये निशा सर्वांना सोडून गेली. निशाच्या मृत्यूची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली. आपल्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी आलेल्या रवीशला तिचा मृतदेह घेऊन थेट स्मशानभूमीवर जावं लागले. काही तासांपूर्वीच निशाचा पती म्हणून धार्मिक विधी करणाऱ्या रवीशला निशावर अंत्यसंस्कार करावे लागले आणि त्यानेच तिला मुखाग्नी दिला.

Post a Comment

0 Comments