सामाजिक संघटनांच्या आंदोलनाने जिल्हा रुग्णालयात गोंधळ

सामाजिक संघटनांच्या आंदोलनाने जिल्हा रुग्णालयात गोंधळ 

वेब टीम नगर : जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्यांना भेटायला येत असलेल्या नातेवाईकांना बंदी घातली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी सोमवारी संध्याकाळी एकच गोंधळ घातला आहे. आम्हाला आमच्या नातेवाईकांना भेटून जेवण-पाणी द्यायचे आहे, त्यांच्या तब्येतीची माहिती हवी आहे. असे सांगणाऱ्या नातेवाईकांच्या बाजूने काही सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उभे राहील्याने जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

या घटने मुळे  कामबंद पुकारलेले जिल्हा रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरु केले.नातेवाईकांमुळे रुग्ण संख्या वाढण्याची भीतीयाबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी झालेल्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. रुग्णालयात क्षमतेपेक्षा दुप्पटीने रुग्ण आहेत, या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात आहे ते आरोग्य कर्मचारी दुपटीने काम करत रुग्णांना बरे करत आहेत. मात्र नातेवाईकांचा वावर प्रचंड वाढला आहे. ते बाधितांच्या संपर्कात येत असल्याने रुग्ण संख्या वाढण्याची भीती आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने काही कडक निर्बंध गरजेचे आहे, त्यामुळे नातेवाईकांना रुग्णाला भेटण्यास निर्बंध लावले आहेत. मात्र मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबद्दल आक्षेप घेत आंदोलन केले आहे.

Post a Comment

0 Comments