काही खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप

काही खासगी रुग्णालयांकडून  रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप 

वेब टीम नगर : कोरोनासंसर्ग विषाणूच्या काळात प्रत्येक नागरिक भयभीत झाला असून या कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे. रुग्णांचे नातेवाईक उपचार मिळण्यासाठी खाजगी हॉस्पिटल कडे मनधरणी करत असतात मात्र काही हॉस्पिटलचे संचालक गैरफायदा उचलून रुग्णांच्या नातेवाइकांकडून शासनाने दिलेल्या बिलासंदर्भातील आदेशाची पायमल्ली करून मोठ्या प्रमाणात लूटमार करत असल्याचे समोर आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणेच बिलाची आकारणी करावी अशी  मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून  केली जात आहे . मनपा आरोग्य समितीच्यावतीने खाजगी हॉस्पिटलांना नेमून दिलेल्या शासनाच्या ऑडिटरकडे केली आहे. तसेच रुग्णांच्या नातेवाईकांन कडून खाजगी हॉस्पिटल चालकांनी लूट थांबवावी अन्यथा कारवाई केली जाईल  असा इशारा मनपा आरोग्य समितीच्या वतीने देण्यात आला.

मनपा आरोग्य समितीच्या वतीने नेमून दिलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या ऑडिटररांची मनपा मध्ये आढावा बैठक झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, सदस्य निखिल वारे, सदस्य सचिन जाधव, सदस्य सतिष शिंदे, ऑडिटर प्रवीण मानकर, निवृत्ती खेतमाळीस, राजेंद्र येळीकर, सुरेश घायमुक्ते, रमेश कासार, भाग्यश्री जाधव आदी उपस्थित होते.

मनपा आरोग्य समितीच्या वतीने पुढे सांगण्यात आलेकी,आरोग्य ही मानवसेवा समजून प्रत्येक डॉक्टरांनी आपली आरोग्यसेवा करावी यासंकट काळामध्ये प्रत्येकाला सहकार्याची खरी गरज आहे. या संकट काळात कोणीही गैरफायदा उचलू नये काही हॉस्पिटलचे विविध प्रकरणे पुराव्यासहित आमच्याकडे आले आहेत,शासनाच्या कुठल्याही अटी-शर्तीचे पालन यांच्याकडून केल्याचे दिसून येत नाही. तरी प्रत्येकाने मानवसेवेच्या भावनेतून काम करावे तसेच बिल भरण्याच्या अगोदरच शासकीय नियमांचे पालन झाले आहे की नाही याची तपासणी होणे गरजेचे आहे.

ऑडिटरांच्या वतीने सांगण्यात आले की, शहरातील काही रुग्णालय शासनाने ठरवून दिलेल्या आदेशामध्ये पळवाटा काढून कोरोनारुग्णांना वाढीव बिले देऊन लूट करत आहे.काही खाजगी रुग्णालयाने अजून पर्यंत आम्हाला हॉस्पिटलमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली नाही, कोरोनारुग्णांच्या पेशंटला डिस्चार्ज देण्याच्या संदर्भात पूर्वकल्पना ऑडिटरला दिली जात नाही तरी बसण्यासाठी ऑडिटरला हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध करून दयावी असे ऑडिटरांच्या वतीने बैठकीत सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments