लॉकडाऊन मध्ये ढील नाहीच

लॉकडाऊन मध्ये  ढील नाहीच वेब टीम नगर : शहरातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात यावी यासाठी ३ मे ते १० मे पर्यंत ७ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार होत असल्याने हाच लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिली आहे. 

महानगर पालिका हद्दीत यापुढील ५ दिवस कडक निर्बंध राहणार असून नगर वासियांनी महापालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षाही आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केली.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी ही साडे तीन हजारांच्या आसपास राहिल्याने प्रशासनाच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. त्यामुले नगर शहरात लागू करण्यात आलेले निर्बंध १५ मे पर्यंत शिथिल करण्यात येणार नाही असेही आयुक्त शंकर गोरे यांनी स्पष्ट केले आहे.       

Post a Comment

0 Comments