लसीकरण केंद्र की सुपर स्प्रेडर्स ...?
वेब टीम नगर : नगर शहरातील लसीकरण केंद्रांवर पहाटे पासूनच लागणाऱ्या रांगा आणि १० ते १२ वाजे पर्यंत लस उपलब्ध आहे कि नाही यावरून होणार गोंधळ आणि सरते शेवटी लस उपलब्ध न झाल्याने आज लसीकरण होणार नाही अशी होणारी घोषणा यातून निर्माण होणारी गोंधळाच्या परिस्थितीमुळे लसीकरण केंद्रानवर जमणारी गर्दी, त्यात सोशल डिस्टंसिंग च्या उडणारा फज्जा यामुळे ही लसीकरण केंद्रे आहेत की सुपर स्प्रेडर्स असा प्रश्न पडतो.
नगर शहरात सिव्हिल हॉस्पिटल , सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल आकाशवाणीकेंद्राजवळ, महात्मा फुले दवाखाना माळीवाडा वेशीजवळ , आयुर्वेद हॉस्पिटल, जिजामाता उद्यान भोसले आखाडा बुरूडगाव, केडगाव , तोफखाना नांगर पालिका दवाखाना आणि मुकुंदनगर ही आठ लसीकरण केंद्रे आहेत. या सर्व केंद्रांवर पहाटेपासूनच लसीकरणासाठी नागरिक रांगा लावतात. मात्र त्यांना दुपारी १२ पर्यंत लास मिळेल किंवा नाही याची माहिती मिळत नाही. कधी कधी मर्यादित प्रमाणात लास आल्यानंतर लास उपलाब्द्ध असे पर्यंतच लसीकरण केले जाते व बाकीच्यांना पुढच्या दिवशी बोलावले जाते मात्र पुढच्या दिवशी लसीकरण नक्की होणार कि नाही याची माहिती दिली जात नसल्याने नागरिक रोजच या केंद्रांवर या केंद्रांवर गर्दी करतात. यात रांगेत उभे असलेल्या नागरिकांमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळणे हा प्रकार नसतो तर अनेकदा रांगेतील नंबर वरून हमरीतुमरीवर येण्याचे प्रकार घडतात,बाचाबाची होते, अनेकदा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो मात्र इतके करूनही लसीकरणासाठी नंबर लागेलच याची खात्री देता येत नाही.
अनेक लसीकरण केंद्रांवर नोंदणी करून दुसऱ्या दिवशीचे टोकन व वेळ दिली जायची मात्र जसजसा लसींचा तुटवडा वाढी लागला तसतसे हे नियोजनही कोलमडू लागले आणि त्यातून पुन्हा वादाचे प्रसंग ओढवले जातांना दिसत आहे.सर्वप्रथम वय वर्ष ६० पुढील जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा दुसरा डोस सुरु आहे. मात्र लसीच्या तुटवड्यामुळे अनेकांना दुसऱ्या डोस पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यातच ४५ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरु केल्याने लसीचा आणखीनच तुटवडा जाणवू लागला आहे. तर गेल्या १ मे पासून वय वर्ष १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरु केल्याने लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण आला आहे. त्यातच लसीचा तुटवडा निर्माण झाल्याने त्यांचे नियोजन कोलमडले आहे.
वास्तविक पाहता १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी "कोचीन ऍप" वर नोंदणी केल्यावर त्यांना जवळच्या लसीकरण केंद्रांवर लसीकरणासाठी वेळ दिली जाते मात्र या "ऍप"ही ताण आल्याने गेल्या काही दिवसापासून हे आप वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे या वयोगटातील तरुणाईची सुद्धा लसीकरणासाठी दमछाक सुरू आहे."कोचीन ऍप" वरून वेळ दिली गेल्यानंतरही प्रत्येक्षात लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने अनेकांना हातात हलवत परतावे लागते. यातूनही तरुणांची तीव्र प्रतिक्रिया उमटते.यावेळी काहीं तरुणांनि बोलतांना अगोदर जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे दोनही डोस पूर्ण होऊ दिले पाहिजेत मगच "कोवीन ऍप"वर नोंदणी करायला लावायची होती. लसच उपलब्ध नाही तर कश्यासाठी आम्हाला बोलावता अशा शब्दात प्रतिक्रिया दिल्या.
तर काहींनी लस उपलब्ध नाही तर कश्यासाठी वृत्त वाहिन्यांवरून, वृत्तपत्रांतून लसीकरणाच्या जाहिराती दाखवता असा सूर लावला. तर अनेक जेष्ठ नागरिकांनीही लसीकरणातील गोंधळावरून तीव्र नापसंती व्यक्त केली. तर अनेक लसीकरण केंद्रांवर तेथील कर्मचाऱ्यांशी बोललो असता ऐन वेळी जाहीर होणाऱ्या नियोजनामुळे सगळं गोंधळ होत आहे. असे सांगून हि नियोजन आदल्यादिवशी झाल्यास नागरिकांनाही त्याबाबतच्या सूचना देता येतील नियोजनातीळ बोजवाऱ्यामुळे आम्हाला नागरिकांना तोंड देतांना नाकीनऊ येते अशा प्रतिक्रया व्यक्त केल्या.
0 Comments