विनापरवाना सँनिटायझर बनविणारा अटकेत

 विनापरवाना सँनिटायझर बनविणारा अटकेत   

वेब टीम श्रीगोंदा : विनापरवाना सँनिटायझर बनविणारा अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून २ लाख १८ हजार ३६६ रुपयांचा सँनिटायझर बनविण्याचे साहीत्य जप्त करण्याची मोठी कारवाई श्रीगोंदा पोलिसांनी केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की,  दि.७ मे २०२१ रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, विकास गुलाब तिखे (रा. काष्टी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर) हा विनापरवाना बेकायदेशिररित्या हॅण्ड सॅनिटायझर तयार करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता त्याची विक्री मेडीकल, दवाखाना इत्यादी ठिकाणी करत आहे. अशी माहीती मिळाल्यावरुन त्यांनी अन्न व औषध प्रसाशन विभागास संपर्क साधुन कारवाई करणेसाठी औषध निरीक्षक यांना बोलावून पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना सदरची माहीती देवून सूचना दिल्या. त्यानुसार काष्टी ते तांदळी जाणारे रोडवर शिक्षक कॉलनी जवळ छापा मारला, असता एका टिन पत्र्याचे शेडमध्ये विकास गुलाब तिखे (वय 28 रा. दत्तचौक काष्टी ता. श्रीगोंदा) हा त्याचेकडील ड्रममधील द्रव्याचे मदतीने निळे डाय (कलर) पाणी व इतर सोलुशन मिक्स करुन हँण्ड सॅनिटायझर तयार करताना त्यास सॅनिटायझर बनविण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नसताना व त्या अनुशंगाने त्याचे कडे कोणीही तज्ञ नसताना मिळुन आला. 

त्याचेकडे सॅनिटायझर बनविण्याचे साहीत्य साधन त्यामध्ये २००लिटरचे प्रत्येकी ६ बँरल ३५ लिटरचे २० कँन ५ लिटरचे १०९ कँन, चंचुपात्र, नरसाळे, गाळण, प्रत्येकी १० बॉटलचे तिन मोठे बॉक्स ज्यामध्य कलर डाय असलेल्या , वेगवेगळ्या फ्लेवर (सुगंधी) चार बॉटल ५० मिलीच्या २५ स्प्रे बॉटल स्टीकर, बिल बुक असे एकुण २,१८,३६६/- रु. किंमतीचे सॅनिटायझर तयार करण्यासाठी लागणारे साहीत्य व साधन सामुग्री मिळुन आल्याने व त्याचेकडे सदरचे हँण्ड सॅनिटायझर बनविण्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याने सदरचे तयार केलेले सॅनिटायझर हे जप्त करुन औषध निरिक्षक अशोक राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनला ड्रग्ज अँण्ड कॉसमेटीक अँक्ट च्या  कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास सपोनि दिलीप तेजनकर करत आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पो.नि.रामराव ढिकले, अहमदनगर औषध निरिक्षक अशोक राठोड, तसेच श्रीगोंदा पोस्टेचे सपोनि दिलीप तेजनकर, पोहेकॉ संभाजी शिंदे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ संतोष कोपनर, पोकॉ शरद चोबे, मपोकॉ लता पुराणे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Post a Comment

0 Comments