श्रीगोंद्यातही लसीकरणाचे नियोजन फसले

 श्रीगोंद्यातही लसीकरणाचे नियोजन फसले 

वेब टीम श्रीगोंदा : गर्दी टाळण्यासाठी श्रीगोंदा नगरपरिषदेने लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करून जेवढी लस उपलब्ध आहे त्यानुसार ऑनलाईन बुकिंग केलेल्या लोकांना फोन करून त्यांच्या क्रमांकानुसार बोलावं जात होतं . परंतु केंद्र सरकारने अध्यादेश काढत कोव्हीन पोर्टल वर नोंद केलेल्या लोकांना त्यांनी निवडलेल्या लसीकरण केंद्रावर लस दिली जावी असा आदेश काढला आहे त्यामुळे नगरपरिषदेने केलेलं नियोजन कोलमडले आहे ज्यांनी नगरपरिषदेकडे बुकिंग केले आहे त्यांना मात्र या नियमामुळे लसीकरणापासून वंचित राहावे लागले आहे.

ज्या लोकांना लस घ्यायची असेल त्यांनी आता फक्त आणि फक्त कोव्हीन पोर्टलवर नोंद करणे गरजेचे आहे शासनाच्या या अध्यादेशामुळे आज श्रीगोंदयात पुणे जिल्ह्यातील काही लोकांनी येऊन लस घेतली त्यामुळे स्थानिक लोक चांगलेच संतप्त झाले पोलिसांनी विनापास लस घेण्यासाठी पुण्याहून आलेल्या काही लोकांना ताब्यात घेतले आहे.

तसेच शासनाच्या आदेशामुळे आज पासून श्रीगोंदा नगरपरिषदेने ऑनलाईन नोंदणी बंद करून टाकली आहे ज्या लोकांनी नगरपरिषदेकडे नोंद केली आहे त्यांना आता लस मिळणार नाही त्यांनी आता कोव्हीन पोर्टल वर नोंद करणे गरजेचे आहे.

यापुढे ज्या लोकांना लस घ्यायची असेल त्यांनी नगरपरिषदेकडे नोंद न करता फक्त सरकारी कोव्हीन पोर्टल वर नोंद करावी असे आवाहन तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments