जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने आणि रुग्णाच्या नातेवाइकांना प्रवेशबंदी

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात वाहने आणि रुग्णाच्या नातेवाइकांना प्रवेशबंदी 

वेब टीम नगर : जिल्हाशासकीय रुग्णालयाच्या आवारात वाहन व रुग्ण नातेवाईकांना जाण्यात मनाई करण्यात आलेली आहे.शासकीय रुग्णालये हे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. त्या ठिकाणी नगर जिल्हयातुन अनेक कोविड पॉझिटीव्ह रुग्ण दाखल झाले आहेत. रुग्णांबरोबर त्यांचे नातेवाईक बऱ्याच प्रमाणात शासकोय रुग्णालयात येत असतात त्या रुग्णांच्या नातेबाईकांमुळे कोविड -१९ या विषाणुचा प्रादुर्भाव वाढु शकतो म्हणुन शासकोय रुग्णालयामध्ये नातेवाईकांची गर्दी होऊ नये म्हणुन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हाशल्यचिकोत्सक यांनी खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत

१) जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात अँम्ब्युलंस, रुग्णालयास साहित्य पुरविणारे वाहने व दिव्यांग यांना घेऊन जाणारे वाहने या वाहना व्यतीरीक्त सर्व प्रकारच्या वाहनांना (शासकीय वाहनासह) अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव केलेला आहे.

२) जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स नर्स,स्टाफ,रुग्णालयातील मेडीकल स्टोअर्स चालवणारे व्यक्‍ती, रुग्ण यांच्या व्यतीरिक्त शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.

३) रुग्णांसाठी सकस भोजन व्यवस्था करण्याबाबत जिल्हाशल्यचिकीत्सक यांना .जिल्हाधिकारी यांनी निर्देशीत केले आहे त्यामुळे रुग्णांना कोणीही नातेबाई भोजन देऊ शकणार नाही किंबा डब्बे देऊ शकरणार नाही.

४) रुग्णांच्या नातेबाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी करु नये असे आवाहन करण्यात येत आहे.

५) शासकीय रुग्णालयाचे मेन गेट वगळता सर्व गेट बंद करणेबाबत जिल्हाशल्यचिकित्सक यांना निर्देशित करण्यात आलेले आहे. 

६) रुग्णांच्या नातेवाईकांकरीता जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मेन गेटच्या दोन्ही बाजुस पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

७) नर्सिंग  कॉलेजच्या बिल्डींग मधे लसीकरणाची व्यवस्था आहे. नसिंग कॉलेजच्या बिल्डींगच्या परिसरात बाहन नेण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे. त्यासाठी तारकपूर बस स्टॅण्ड ते पत्रकार चौक जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजुस पार्किंगची  व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

Post a Comment

0 Comments