कारमध्ये केला युवकाने तरुणीचा विनयभंग

 कारमध्ये केला युवकाने तरुणीचा विनयभंग 

वेब टीम  नागपूर : वडिलाने बोलाविल्याची बतावणी करून युवकाने कारमध्ये २७ वर्षीय तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने प्रसंगावधान राखत युवकाला लाथ मारून स्वत:ची सुटका केल्याने अनर्थ टळला. ही खळबळजनक घटना एमआयडीसी भागात रविवारी घडली. तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी सोनू नावाच्या युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ही 'होम पेंशट केअर टेकर' म्हणून काम करते. रविवारी सकाळी सोनू नावाच्या युवकाने तरुणीच्या मोबाइलवर संपर्क साधला. 'माझ्या वडिलांनी तुम्हाला बोलाविले आहे. मी तुम्हाला घ्यायला येतो', असे सोनू तिला म्हणाला. सकाळी नऊ वाजता सोनू तरुणीच्या घरी गेला. तिला घेऊन तो कारने जात होता. अचानक त्याने कार थांबविली. कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. तरुणीने आरडा-ओरड केली. तिला मदत मिळाली नाही. प्रसंगावधान राखत तरुणीने सोनूच्या पोटावर लाथ मारली. कारमधून बाहेर उतरली व जीव मुठीत घेऊन पळायला लागली. सोनूने तिचा पाठलाग केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारेल, अशी धमकी दिली व कार घेऊन पसार झाला. तरुणीने एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोबाइल क्रमांकाच्या आधारे सोनूचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments