कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची बैठक

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी बालरोग तज्ज्ञाची बैठक 


वेब टीम नगर : कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने पूर्ण क्षमतेने उपाय योजना केल्या आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे मध्ये सर्वांच्या सहकार्यातून व उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.परंतु तज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट येणार असून या लाटेमध्ये बालकांवर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या असून शहरांमध्ये बालकांसाठी ऑक्सीजन बेडची निर्मिती करणार आहे,यासाठी बालरोग तज्ञांची कमिटी नेमणार असून,शहरातील बालरोग तज्ञाचे सहकार्य घेतले जाणार आहे.सुदैवाने आपल्यावर तिसऱ्या लाटेची वेळ येऊ नये यासाठी शहरातील बालरोग तज्ञांनी पालकांमध्ये जनजागृती करून बालकांची काळजी घेण्याच्या सूचना कराव्यात तसेच घाबरून न जाण्यासाठी माहिती द्यावी, मनपाची आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याचे प्रतिपादन आयुक्त शंकर मोरे यांनी व्यक्त केली. 

        कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका व मनपा आरोग्य समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील बालरोग तज्ञांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आयुक्त शंकर गोरे,आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ.सागर बोरुडे, आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, सदस्य निखिल वारे, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक आप्पा नळकांडे, बालरोग तज्ञ डॉ.मंगेश कुलकर्णी,डॉ. पियुष खंडेलवाल,डॉ.दीपक अग्रवाल,डॉ.श्याम तारडे, डॉ.मकरंद धर्मा,डॉ. गौरव मचाले,डॉ.नानासाहेब अकोलकर तसेच आधी बालरोग तज्ञ उपस्थित होते.

      यावेळी बोलताना नगरसेवक सागर बोरुडे म्हणाले की, मनपा आरोग्य समितीच्या वतीने बालरोग तज्ञ यांची बैठक घेण्याच्या सूचना आरोग्य समितीच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली असे त्यांनी सांगितले, तिसऱ्या लाटे साठी सर्वांच्या सहकार्याची खरी गरज आहे नक्कीच आपण ही तिसरी लाट परतून लावून असे ते म्हणाले.( फोटो-मीटिंग )

Post a Comment

0 Comments