तालुका पोलिसांची पोलिसांची धडक कारवाई

तालुका पोलिसांची पोलिसांची धडक कारवाई 

नेप्तीतील  दारू अड्डे उध्वस्त 

वेब टीम नगर : नगर तालुक्यातील नेफ्ती येथील तीन गावठी दारूअड्डे उद्ध्वस्त करण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी बुधवार (दि.५) केली.

याबाबत समजलेली माहिती अशी की, छाप्यात नगर तालुक्यातील नेफ्ती येथे पोलिसांनी चौगुलेवस्तीवर बाभळीच्या झाडाखाली सुरू असलेल्या गावठी हातभट्टीवर छापा टाकून १० हजार रु.किं.ची गावठी हातभट्टी दारू तयार व २४ हजारांची दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ४०० लिटर असा एकूण ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल आणि चौगुलेवस्ती येथेच सुनिल बाजीराव पवार याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या ओडशाला सुरू असणारा दुस-या गावठी दारूभट्टी अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. या छाप्यात ७ हजार रुपयांची गावठी दारू तयार करण्याचे ७० लिटर व ३६ हजार रुपये गावठी हातभट्टी दारू तयार करण्याची कच्चे रसायन ६०० लिटर असा एकूण ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर तिसऱ्या ठिकाणी सुनील बाजीराव पवार याच्या राहत्या घराच्या भिंतीच्या ओडशाला सुरू असणाऱ्या हातभट्टीवर छापा टाकून या ठिकाणाहून ३० हजार रुपयांचे ५०० लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चा रसायन जप्त केले व हातभट्टी उद्ध्वस्त केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार व पोसई आर एम राऊत, सफौ पठाण, मपोहेकाॅ शेख, पोना राहुल शिंदे, पोहेकाॅ धुमाळ, चापोहेकाँ इथापे, पोना मरकड, योगेश ठाणगे, खेडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 



Post a Comment

0 Comments