बूथ हॉस्पिटलच्या रुग्णसेवेने भारावलो : कमांडर कर्नल वानलाल फेला
वेब टीम नगर : बूथ हॉस्पिटलचे कर्मचारी रुग्णांची मनोभावे सेवा करतात त्यामुळे इथून अनेक रुग्ण बरे होऊन गेले हे पाहून आम्ही भारावून गेलो.असे उद्गार साल्व्हेशन आर्मीचे कमांडर वानलाल फेला यांनी काढले .
साल्वेशन आर्मीचे टेरिटोरियल कमांडर कर्नल वानलाल फेला व चीफ सेक्रेटरी लेफ्टनंट कर्नल जॉन विल्यम यांनी साल्वेशन आर्मी संचलित बूथ हॉस्पिटलला भेट देऊन कोविडच्या कामाची पाहणी केली.
मागील एक वर्षापासून कोविड रुग्णांच्या उपचारासाठी लागणारे सर्व सहकार्य पाठबळ साल्वेशन आर्मी या संस्थेने बूथ हॉस्पिटलला दिले. कोविड काळात लागणारी पी पी ई किट, मास्क, तसेच सॅनिटायझर व ७० ऑक्सिजनचे बेड, व्हेंटिलेटर इत्यादी वस्तूंचा पुरवठा त्यांनी केला. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आपल्याकडे उपचार करताना मर्यादा येतात मात्र त्यावर मात करून आपण सर्वांनी स्वत:ला या कामात झोकून देऊन रुग्णांची सेवा केली त्यामुळे अनेक रुग्ण बरे होऊन इथून आपापल्या घरी गेले. शेवटी आपल्याकडे जेवढी बेडची संख्या आहे तेवढ्याच रुग्णांची सेवा करणे शक्य होते मात्र रुग्ण बूथ हॉस्पिटलमध्ये उपचार मिळावेत यासाठी वाट पाहतात त्यांच्या संयमाला दाद दिली पाहिजे येथे उपचार चांगले मिळतात म्हणूनच ते वाट पाहतात त्या सर्वांची आपल्या हातून सेवा घडो, आम्ही जरी मुंबईत राहत असलो तरी आपण करीत असलेल्या रुग्णसेवेची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते.
सरकारने आपत्कालीन परिस्थिती म्हणून घोषित केलेली असल्याने आपण सर्वांनी एकमेकांची मदत करायला हवी या परिस्थितीत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी कामाची पाहणी करत असताना त्यांनी बूथ हॉस्पिटलच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कोरोना काळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कौतुक केले, तसेच रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलला सहकार्य करावे असे आवाहनही केले.
याप्रसंगी लेफ्टनंट कर्नल बी रणदिवे, हॉस्पिटल प्रशासक मेजर देवदान कळकुंबे उपस्थित होते.
0 Comments