बाळ बोठेला नगरच्या कारागृहातच ठेवा

 बाळ बोठेला नगरच्या कारागृहातच ठेवा 

वेब टीम नगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्यसूत्रधार आरोपी बाळ बोठेच्या पहिल्या आयफोन चे लॉक  अद्याप उघडलेले नसताना त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत मोबाईल आढळून आल्याने बोठेच्या मनामध्ये केलेल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नसल्याचे सिद्ध झाले आहे.  बोठे यास पारनेर येथील दुय्यम कारागृह ठेवणे घातक ठरू शकते बोठे यांच्यासारख्या अट्टल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हलवणे  योग्य राहील अशी विनंती मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे तसेच त्याचे वकील सचिन पाटेकर यांनी पोलिस अधीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  

 बोठे  हे पारनेर येथील ज्या कोठडीत आहे त्या कोठडीतील दोन आरोपींकडे मोबाईल आढळून आले आहेत.  कारागृहातील  पाणी बाहेर जाण्याच्या पाईप मध्ये ते ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे . या संदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे . या कोठडीत असलेल्या पत्रकार बाळ बोठे  याच्यावर रेखा जरे यांची  हत्या, खंडणी तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.  या घोटाळ्यातील आरोपी कडील मोबाईल बोठे यांनीही वापरल्याचा  संशय जर व पटेकर यांनी या निवेदनात केला आहे. बोठे याने हा फोन वापरून आणखीन काही नियोजन तर केलें न सावें असा प्रश्न या निवेदनात व्यक्त करण्याचा उपस्थित करण्यात आला आहे . कोणाकोणाशी  संपर्क साधण्यासाठी त्यांनी हा फोन वापरला असेल.  जरे  यांच्या हत्याकांडात वापरलेला मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे . तसेच उघडत नसल्याने पोलिसांनी तो फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला आहे.  त्याचा अहवाल अद्याप पावेतो येणे बाकी आहे.  त्यातच दुसऱ्या फोनचा  विषय पुढे आल्याने  या निवेदनात आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.  

बोठे यांनी केलेल्या गुन्ह्या चे स्वरूप पाहता तो कोठडीत  मोबाईल वापरत असेल तर त्याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही भीती दिसत नाही.  अजूनही बोठे यास पारनेर येथील दुय्यम कारागृहात ठेवणे किती घातक ठरू शकते हे कोठडीत सापडलेल्या मोबाईलच्या ज्वलंत उदाहरणावरून स्पष्ट होते आहे . त्यामुळे या अट्टल गुन्हेगारास नगर येथील कारागृहात हलवणे हेच योग्य राहणार आहे.  अन्यथा यात असंख्य जीव जाण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे जरे व पटेकर यांच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री गृहमंत्री पोलिस महासंचालक तसेच पारनेरच्या पोलिस निरीक्षक यांना पाठवण्यात आले आहेत. 

Post a Comment

0 Comments