आज जिल्ह्यात २१२३ कोरोना बाधितांची नोंद

आज जिल्ह्यात २१२३ कोरोना बाधितांची नोंद 

तर रेमडेसीवीरचा काळाबाजार सुरूच 

वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत चढ उतार होत असून गेल्या काही  दिवसातील बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठलेला असतांना आवाज पुन्हा कोरोना बाधितांच्या संख्येत दिड - पावणे दोन हजारांची घट आल्याने जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.  आज जिल्ह्यात २१२३ बाधितांची नोंद झाली आहे.

 अहमदनगर शहरात - ४२६, तर राहता - १२१,संगमनेर - १०४, श्रीरामपूर - ११६ , नेवासे -७५, नगर तालुका -१९७,पाथर्डी-९६,अकोले - २६७,कोपरगाव - ७९, कर्जत - १०१, पारनेर - १३४, राहुरी - ११३, भिंगार शहर - ३३ , शेवगाव - १२७,जामखेड - १५, श्रीगोंदे - ८४, मिलिट्री हॉस्पिटल - ०१, इतर जिल्ह्यातील - ३१, इतर राज्यातील - ०३ अशी आजची आकडेवारी आहे. अर्थात काळ बरे झालेल्या रुग्णांची आकडे वारीही बरी आहे.अशी एकुण २१२३ बाधितांची नोंद झाली आहे. 

दरम्यान जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनची कला बाजारात जास्त दारात विक्री सुरूच आहे. पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त वृत्ताने तारडे हॉस्स्पटल बालिकाश्रम रोड अहमदनगर, तसेच काका साहेब म्हस्के मेडिकल कॉलेज च्या कमानीजवळ काही व्यक्ती स्वतःच्या आर्थिक  फायद्या करीता आजारावर लागणाऱ्या रेमडेसीवीर इंजेक्शनची जास्त दराने वक्री करतांना मिळून आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी औषध निरीक्षक विवेक खेडकर यांना लेखी पत्राद्वारे माहिती कळवून स्थानिक गुन्हा शाखेच्या कार्यालयात बोलवून घेतले त्यानंतर सपोनि.सोमनाथ दिवटे, मिथुन घुगे, पोसइ गणेश इंगळे , पोहेकॉ विश्वास बेरड, संदीप घोडके, पोना , सुरेश माळी, शंकर चौधरी, पोकॉ सागर ससाणे, रवींद्र पुंगासे, मयूर गायकवाड यांच्या सह औषध निरीक्षक विवेक खेडकर यांनी  कारवाई केली. रेमडेसिवीर  इंजेशनची विक्री करणाऱ्या इसमाला बनावट ग्राहकाच्या मध्यस्तीने फोन करून इंजेक्शन ची चौकशी किकली असता या इसमाने २७००० रुपयाला इंजेक्शन देण्याचे कबुल करून तारडे हॉस्पिल जवळ बोलविले या इसमाला स्कॉर्पियो जीप सह ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता १ रेमडेसिवीर  इंजेशन आणि स्कॉर्पियो जीप एम एच १४ डीटी ९३२३  असा एकूण ७,१२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.   

Post a Comment

0 Comments