आज रात्री पासून नगर मध्ये कडक लॉकडाऊन

आज रात्री पासून नगर मध्ये कडक लॉकडाऊन  

काय सुरु राहणार काय बंद होणार ?

वेब टीम नगर : आज रात्री १२ वाजल्यापासून ते १० मेच्या मध्यरात्री पर्यंत शहरांमधे गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.त्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट दिली जाणार नाही. 

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन हे निर्बंध लागू करण्यात आले असून त्या व्यतिरिक्त नागरिकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

काय सुरु राहणार :

१. वैद्यकीय सेवा व औषध दुकाने या काळात सुरु राहतील. 

२. अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेत सुरु राहतील. 

३. घरपोहोच गॅस वितरण सेवा सुरु राहील 

४. सर्व बँका सुरु राहतील 

५. दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. 

६.पशु खाद्य विक्री सकाळी ७ ते ११ सुरु राहील 

काय बंद असणार : 

१. किराणा दुकाने तसेच मालाची खरेदी विक्री बंद राहील 

२. भाजी पाला व फळबाजार मालाची खरेदी विक्री करणे बंद राहील. 

३.सर्व खाजगी आस्थापना पूर्णतः बंद राहतील. 

४. अंडी , मटण , चिकट व मतसदीय विक्री बंद राहील 

कोणतीही व्यक्ती,संस्था,संघटना यांनी वरील आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिते नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहतील असा आदेश अहमदनगर महानगर पालिकेचे आयुक्त यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आले आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भावाने उग्र रूप धारण केले असून कोरोनाचे ३८२२ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. संगमनेर - ५६६, महानगरपालिका क्षेत्रात-५४७,श्रीगोंदा -३४७ , नगर तालुका परिसरात- ३१७, कर्जत - २६७, राहता - २५९ , कोपरगाव - २१०, पारनेर- २०१, अकोले - १९२, राहुरी-१८७, नेवासे-१७१, शेवगाव - १५५, पाथर्डी- १२७, श्रीरामपूर १०४, इतर जिल्ह्यातील -७५ , भिंगार कॅंटोन्मेंट- ६१, जामखेड-१८, मिलिटरी हॉस्पिटल -१४ आणि परराज्यातील - ०४ असे ३८२२ बाधितांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.           

Post a Comment

0 Comments