अ .भा. मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्यमंत्र्याना निवेदन

 अ .भा. मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्यमंत्र्याना निवेदन 

वेब टीम नगर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्या कडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांना कलावंत,तंत्रज्ञ व कामगार वर्गासाठी १५ दिवसीय लॉकडाउन मध्ये विशेष आर्थिक मदत द्यावी यासाठी विनंती पत्र

मुख्यमंत्री साहेब आपण महाराष्ट्रात दि.१४/४/२०२१ पासून संचारबंदी व लॉक डाउन लागू केला.त्यानुसार सर्वप्रकारच्या चित्रिकारणावरही बंदी घातलीत,आपल्याला कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी आमचा पूर्ण पणे पाठिंबा आहे.

आपण विविध कर्मचारी वर्गाला या कालावधीत आर्थिक सहाय्य घोषित केले आहे.आपणास नम्र विनंती आहे की,सर्व प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने या व्यवसायावर अवलंबून असणारे रोजंदारी वरील कलावंत, तंत्रज्ञ व कामगार यांची व त्यांच्या परिवाराची उपासमार होणार आहे.कला व कलावंत कायमच राजाश्रयावरच अवलंबून असतात.

आपणास नम्र विनंती आहे की,आपण कलावंत,तंत्रज्ञ व कामगार वर्गासाठी विशेष आर्थिक मदत देवून या वर्गाला दिलासा द्यावा ही विनंती.

यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व इतर संस्था ज्या शासनाकडे रजिस्टर आहेत,त्यांच्या सभासदांना ही मदत देण्यात यावी अशी अध्यक्ष  मेघराज राजे भोसले यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे. अशी माहिती अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ अहमदनगर जिल्हा मुख्य समन्वयक .शशिकांत नजान यांनी दिली.

Post a Comment

0 Comments