रुग्णवाहिकेमधुन वाडीवस्तीवर कोराना प्रतिबंधक लस पोहचवा

रुग्णवाहिकेमधुन वाडीवस्तीवर कोराना प्रतिबंधक लस पोहचवा


शरद पवळे : कोरोना प्रतिबंधक लसच कोरोनाचा कहर थांबवेल

वेब टीम पारनेर : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची तिव्रता अत्यंत भयंकर असुन या लाटेमध्ये अनेकांनी आपला जीव गमावला असुन यामध्ये अनेकजन जीवाची पर्वा न करता या लढ्यामध्ये जीवाची बाजी लावुन यथाशक्ती योगदान देताना दिसत आहेत आरोग्य केंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या ठिकाणी नागरिकांची होणारी गर्दी धोकादायक असुन खेड्यापाड्यातील नागरिकांना आरोग्य केंद्रात रांगेत उभे रहावे लागणे,त्यांचा येण्या जाण्याचा संघर्ष त्यातच १मे पासुन १८ वयोगटाच्या पुढील व्यक्तींना लसीकरण सुरु झाल्यास मोठी गर्दी आरोग्य केंद्रामध्ये होईल यासाठी आरोग्य विभागाने उपकेंद्रांच्या माध्यमातुन वाडीवस्तीवर नागरिकांच्या याद्या करुन सोशल डिस्टंसिंग पाळत रुग्णवाहीकेच्या माध्यमातुन लसीकरणाचे डोस दिल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व पुढचा येणारा धोका यामुळे टळेल त्याचबरोबर नागरिकांनी आलेल्या संकटाला स्वत:ला सुरक्षित ठेवुन सामोरे गेले पाहीजे परिस्थितीचे गांभिर्य पाहुन प्रत्येकाने या कोरोनाच्या लढ्यात प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घेतलच पाहीजे व ईतरांनाही प्रोत्साहीत करुन कोरोनाचा कहर थांबवण्यासाठी नागरिकांनी लसीकरणाची ढाल पुढे केल्यास कोरोसोबतची लढाई आपण नक्कीच जिंकणार असुन याविषयी आपण आरोग्य अधिकार्‍यांशी संपर्क साधणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  मनोगत व्यक्त केले.



Post a Comment

0 Comments