वाझेंच्या लेटर बॉम्बने खळबळ ; शपथा घेणाऱ्या परबांना भाजपाचा टोला

वाझेंच्या लेटर बॉम्बने  खळबळ ; शपथा घेणाऱ्या परबांना भाजपाचा टोला 

वेब टीम मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन सापडल्याप्रकरणी अटकेत असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्ब ने  राज्यात पुन्हा  खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी ‘एनआयए’ला दिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. यावेळी त्यांनी माझे दैवत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची व माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, सचिन वाझे यांच्या पत्रातील आरोप खोटे आहेत, असं भावनिक स्पष्टीकरण दिलं.

अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत टोला लगावला आहे. शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते असा टोला लगावताना तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा असा उपहासात्मक सल्ला अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आरारा… काय वेळ आली आहे अनिल परब यांच्यावर…त्यांना कोणी तरी सांगा, ह्याच्या त्याच्या शपथा घेऊन न्यायालयातून सुटका होत नसते. तुम्हीही दिल्लीत जाऊन एखादा वकील गाठा”असा टोला लगावला आहे.

Post a Comment

0 Comments