नगरच्या कलाकाराने साकारले कोरोनासाठी उपयुक्त रुग्णवाहिकेचे चित्र

नगरच्या कलाकाराने साकारले  कोरोनासाठी उपयुक्त रुग्णवाहिकेचे चित्र 

वेब टीम नगर : कोरोना महामारीने पुर्ण जगात थैमान घातला आहे. त्यात रुग्णांना लागणारे इंजेक्शन व ऑक्सिजन  साठा कमतरता. डाॅक्टर आपल्या परीने रुग्ण सेवा,  संबंधित शासकीय कार्यालय, हाॅस्पिटल आपले कर्तव्य निभावत आहे. 

अहमदनगरचे कलाकार हेमंत दंडवते यांचे नेहमी समाज उपयुक्त संकल्पना, योजना, कल्पना चित्र रुपात मांडत असतात, या अगोदर त्यांनी तयार सिमेंट ड्रेनेज टाकी, रस्ता कचरा व्हॅक्युमव्दारे उचलणे वाहन इ. चित्र रुपात तपशील सह संकल्पना मांडल्या आहेत. 

असेच आत्ता कोरोनाच्या पार्श्व्भूमीवर 'ऑक्सिजन दूत' रुग्णवाहिका डिझाईन केली आहे. हे वाहन डिझेल किंवा सौर ऊर्जा वर चालविता येईल. या रुग्णवाहिकेच्या आत मध्ये दोन्ही बाजूस ऑक्सिजन बेड असतील, व टपावर ऑक्सिजन टाकीतून मल्टी कनेक्शन देता येईल, पाणीपुरवठा टाकी तसेच वाहनाच्या खाली निचरा पाणी टाकी असेल. वाहनचालक केबिनच्या मागे ए.सी औषधे स्टोअर असेल, तसेच रुग्णवाहिका बाहेर दोन्ही बाजूंना वाफ घेण्यासाठी सोय असेल, त्याचबरोबर लसीकरण ही करतात येईल. सॅनिटाइजर व बेसिनची सोय असेल.  ही रुग्णवाहिका रुग्णांच्या ठिकाणी, अडचणींच्या जागी, खेड्यापाड्यात, वाड्या वस्तींवर पोहचण्यास उपयुक्त ठरेल व वेळेत रूग्णांना उपचार मिळेल. संबंधित जिल्हा रुग्णालय, महापालिका व शासकीय कार्यालये, खाजगी कंपन्या यांनी अशाप्रकारच्या रुग्णवाहिका  विकसित करावयात असे आवाहनही हेमंत दंडवते यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments