अपहरण झालेल्या रोहिदास दातीर या पत्रकाराची निर्घृण हत्या

अपहरण झालेल्या रोहिदास दातीर या पत्रकाराची निर्घृण हत्या

वेब टीम नगर : जिल्ह्यामधील राहुरी तालुक्यात एका पत्रकाराचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे . राहुरी मधील एका साप्ताहिकाचे पत्रकार माहितीचा अधिकार या क्षेत्रातील कार्यकर्ते रोहिदास दातीर यांची  अपहरणानंतर हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेले वाहन हस्तगत केले असून आरोपीचा शोध घेत आहेत . 

 या प्रकाराबद्दल मिळालेली माहिती अशी की पत्रकार दातीर यांचे काल दिनांक ६ एप्रिल मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास राहुरी शहरातील मल्हारवाडी रस्त्याने  आपल्या दुचाकीवरून घरी जात होते सात पीर बाबा दर्गा जवळून जात असताना एका चारचाकी वाहनातून आलेल्या लोकांनी त्यांना मारहाण करून गाडीत बसवले आणि निघून गेले पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तिथे धाव घेतली दातीर यांची दुचाकी आणि पायात चप्पल घटनास्थळी मिळून आली .  पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध मोहीम हाती घेतली सीसीटीव्ही व प्रत्यक्ष दर्शन कडून मिळालेल्या माहितीनुसार यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा  तपास लागला पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र आरोपी मिळाले नाहीत .  रात्री राहुरी कॉलेज रोड परिसरात दातीर यांचा मृतदेह आढळून आला त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. 

 त्यांची पत्नी सविता यांनी राजकीय व्यक्तीच्या  जवळच्या व्यक्तीने अपहरण केल्याचा आरोप केला आहे.  यापूर्वी अनेक वेळा त्यांच्यावर हल्ला झाला होता राहुरी तालुक्यातील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या दातीर यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून राहुरी तालुक्यातील अनेक घटनांना वाचा फोडली होती . त्याप्रकारणांची  त्यांच्या हत्येशी काही संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहेत त्यांची पत्नी सविता रोहिदास दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांनी विरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला आहे. 

Post a Comment

0 Comments