संचारबंदीच्या सातदिवसांनी रुग्ण संख्येत घट दिसेल : डॉ.तात्यासाहेब लहानें

संचारबंदीच्या सातदिवसांनी रुग्ण संख्येत घट दिसेल : डॉ.तात्यासाहेब लहानें 

वेब टीम मुबई : महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाबाधितांची संख्या दररोज नवनवे उच्चांक गाठत आहे. त्यामुळे राज्य सरकारने १५ दिवसांची संचारबंदी लागू केली. परंतु मागील दोन-तीन दिवसांत कोरोनाबाधितांची वाढतीच आहे. मात्र संचारबंदीच्या सात दिवसांनी रुग्णसंख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असा विश्वास असा विश्वास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केला. तात्याराव लहाने एबीपी माझाशी बोलत होते. 

संचारबंदीमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरु नये. लोकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी संचारबंदी खूप महत्त्वाची आहे. संचारबंदीचा परिणाम सात दिवसांनी दिसेल. सात दिवसांनी रुग्ण संख्येत घट होण्यास सुरुवात होईल, असं तात्याराव लहाने म्हणाले.

"कोरोनाची लक्षणे दिसल्यास ते अंगावर काढू नये. तातडीने उपचार सुरु करावेत. आजार बळावल्यानंतर उपचार करणं कठीण जातं," असंही तात्याराव लहाने यांनी म्हटलं-

'ऑक्सिजन सर्वांना मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील'

"राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. परंतु सरकारने शंभर टक्के ऑक्सिजन हा रुग्णांसाठी राखीव केलेला आहे. इतर राज्यातून ऑक्सिजन मिळावा यासाठी राज्य सरकारने विनंती केलेली आहे. ऑक्सिजन सर्वांना मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे," असं तात्याराव लहाने यांनी नमूद केलं.

२० एप्रिलनंतर रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होईल : डॉ. लहाने

"रेमडेसिवीर इंजेक्शन कोणी वापरावं याच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, परंतु त्या पाळल्या जात नाहीत. 20 एप्रिलनंतर रेमडेसिवीरचा तुटवडा कमी होईल," असा विश्वास डॉ. लहाने यांनी व्यक्त केला. तसंच रेमडेसिवीर इंजेक्शन म्हणजे काही अमृत नाही, ही गोष्ट डॉक्टरांनी आणि रुग्णांनी लक्षात घ्यावी, असंही नमूद केलं.


Post a Comment

0 Comments