' त्या 'मेडिकलवाल्याचा जबाब कोतवाली पोलिसांनी नोंदविला

' त्या 'मेडिकलवाल्याचा जबाब कोतवाली पोलिसांनी नोंदविला 

वेब टीम केडगाव :  केडगाव येथील नरेंद्र मेडिकल येथे रेमडेसीवीर इंजेक्शन घेण्यासाठी नागरिकांनी रविवारी (दि.११) गर्दी केली. या दरम्यान इंजेक्शन न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले होते. या घटनेबाबत पोलीसांना माहिती मिळताच, यावेळी पोलिस वेळेत दाखल होऊन गर्दी पांगविण्यात आली. मेडिकल चालकास चौकशीसाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते.

 याबाबत कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगांवकर यांनी सांगितले की, केडगाव येथील नरेंद्र मेडिकलमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली.या माहितीआधारे पोलीस कर्मचारी केडगाव येथे गेले होते. यानंतर मेडिकल चालक चोरडिया यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर चोरडिया यांनी शनिवारी रात्री १०२ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होते. त्या इंजेक्शनची एमआरपी किंमत ५,४०० रुपये असून, आम्ही ४ ते ४,५००रुपयांना ती इंजेक्शन विकले आहे.

 उपलब्ध इंजेक्शन संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना कागदपत्रे पाहून त्यांना विकल्याचे जबाबात चोरडिया यांनी सांगितले आहे.मात्र त्यांनी ग्राहकांची एक व्हाट्स अप यादी तयार केली होती . त्याच्या क्रमवारीनुसार औषध वाटप ना करता  आपल्या परिचितांना चढया भावाने औषध विकल्याची चर्चा केडगाव परिसरात होती .    याबाबत अन्न औषध प्रशासन अधिकारी  राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, राञीतून नगर जिल्ह्यासाठी १५२० रेमडेसिवीर इंजेक्शन आले होते, अशीही माहिती पो.नि मानगांवकर यांनी दिली.


Post a Comment

0 Comments