महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला मोठे यश सर्व खाजगी हॉस्पिटलला मोठा दणका : नितीन भुतारे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लढ्याला  मोठे यश सर्व खाजगी हॉस्पिटलला मोठा दणका : नितीन भुतारे

कोरोना बिलांची तपासणी करण्याकरिता २६ खाजगी हॉस्पिटल मध्ये ३२ ऑडिटर ( लेखापरीक्षकांचीची) नेमणुक

वेब टीम नगर : मनसेच्या नितीन भुतारे यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे खाजगी हॉस्पिटल मधील वाढीव बिलांची तपासणी  हि रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या आधीच करण्यात येणार आहे. त्याकरीता खाजगी हॉस्पिटल मालकांनी रुग्णांचे बिल हे महानगर पालिकेने नेमणूक केलेल्या ऑडिटर कडे रुग्णाला डिस्चार्ज देण्या अगोदर जमा करणे बंधनकारक असणार असून शासकीय नियमांनुसार दरानुसार तपासणअंती रूग्णांना रुग्णांचा नातेवाईकांना हे बील भरावे लागणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एका बाजूला खाजगी हॉस्पिटल मधील वाढीव बिलांची लूटमार थांबणार आहे. त्यामुळे डॉक्टर चांगलेच धास्तावले आहेत. आता कोणताही रुग्णांची  डीपॉझिट रक्कम भरण्याकरीता अडवणूक होणार नाही. तसेच रुग्णांचा नातेवाईकाने बिलाची तपासणी ऑडिटर मार्फत झाल्यानंतरच बील भरावे. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  आले आहे.

बिलांची तपासणी करणाऱ्या ऑडिटर ची संपूर्ण यादी माहिती हि सर्व खाजगी हॉस्पिटल च्या प्रवेश द्वारावर लावण्यात येणार आहे. या प्रक्रियेला मंजुरी दिल्याबद्दल तसेच खाजगी हॉस्पिटल मध्ये ऑडिटर ची नेमणूक केल्या मुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ , शहराध्यक्ष गजेन्द्र राशिनकर जिल्हा उपाध्यक्ष मनोज राउत महिला जिल्हाध्यक्षा ऍड अनिता दिघे तसेच विनोद काकडे, परेश पुरोहित सर्व उपशहराध्यक्ष व पदाधिकऱ्यांनीही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले तसेच महानगर पालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांचे आभार मानण्यात आले आहे.

अहमदनगर शहरातील खाजगी हॉस्पिटल व त्या ठिकाणी नेमणूक झालेले ऑडिटर यांची यादी

१)साईदिप हॉस्पिटल श्री पी यु चव्हाण विराज इस्टेट यशवंत कॉलनी तरकपुर 

२)नोबेल हॉस्पिटल श्रीमती जे व्ही गायकवाड धनाजी नगर प्रेमदान चौक सावेडी

३) डेली हेल्थ हॉस्पिटल श्री आर एस कदम तपोवन रोड

४) हराळ हॉस्पिटल 

श्री एम पी पेटकर

श्री एस एल कुलकर्णी

नगर मनमाड रोड जाधव पेट्रोल पंपा जवळ

५) रेणुकामाता हॉस्पिटल श्री के एफ गायकवाड अंबिका नगर केडगाव बस स्टॉप जवळ

६) स्वास्थ हॉस्पिटल श्री जे आर चौरे

आण्णा भाऊ साठे चौक

७) मॅक केअर हॉस्पिटल श्री अनंत साठे झोपडी कॅन्टीन जवळ सावेडी रोड

८) ईम्पल्स हॉस्पिटल श्री रवींद्र काजळकर सावेडी नाका सावेडी

९) बर्न सेंटर श्री एस पी चक्राल साथ्था कॉलनी नेवासकर पेट्रोल पंपा जवळ स्टेशन रोड

१०) साई एशियन हॉस्पिटल श्रीमती एस एन वडणे विराज इस्टेट तारकपुर बस स्टँड समोर

११) लाईफलाईन हॉस्पिटल श्री आर बी भालशंकर 

श्रीमती वर्षा गोरकर

विराज इस्टेट तारकपुर बस स्टँड समोर

१२) अॅपेक्स हॉस्पिटल श्री पी आर सैंदाने आयसीआयसीआय बँकेच्या समोर मनमाड रोड सावेडी

१३) न्युक्लिअस हॉस्पिटल श्री पी टी गायकवाड तांदळे हाईट्स बालिकाश्रम रोड

१४) विघ्नहर्ता हॉस्पिटल श्री जे आर ठाकरे

श्री पी एस गडाख न्यु टिळक रोड

१५) श्रीदिप हॉस्पिटल श्री व्ही बी नडे स्टेशन रोड बडवे पेट्रोल पंपा जवळ

१६) फाटके हॉस्पिटल श्री एम एस सोनटक्के अक्षता गार्डन जवळ स्वस्तिक चौक

१७) क्रिस्टल हॉस्पिटल श्री एस बी पवार झोपडी कॅन्टीन नगर मनमाड रोड सावेडी

१८) अनिल जाधव हॉस्पिटल श्री शांताराम ठाकरे भगवती गीता कॉम्प्लेक्स एकविरा चौक , पाइपलाइन रोड

१९) प्राईम केअर हॉस्पिटल श्री आर एस कावट डोके नगर एकविरा चौक रोड सावेडी

२०) सुरभी हॉस्पिटल जे एम बनसोडे

श्री पी ए ठाकूर गुलमोहर रोड कॉर्नर नगर औरंगाबाद रोड सावेडी

२१) विघ्नहर्ता हॉस्पिटल श्री एस सी दराडे नेप्ती नाका रोड नाले नाले गाव 

२२) युनायटेड सिटी हॉस्पिटल श्री विजय वाळके किंग्ज रोड कोठला स्टँड

२३) शिवनेरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल श्रीमती विजया शेळके मार्केट यार्ड

२४) बूथ हॉस्पिटल श्री पी पी अवारे जनरल पोस्ट ऑफिस समोर

२५) केअर प्लस हॉस्पिटल श्री आर जी मोरे अकोलकर हॉस्पिटल मागे बुरुड गाव रोड

२६) राज माता कोव्हिड सेंटर सौ रा स जाधव केडगाव देवी रोड

वरील प्रमाणे संबंधित लेखापरीक्षक हे संबंधित कोरोना आजारावरील बिलांची शासन नियमाप्रमाणे बेड च्या दराप्रमाणे तपासणअंती बिलांची रक्कम ठरवल्या नंतरच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येईल सदर रूग्णांची बिले हि आधी लेखापरीक्षकांकडे हॉस्पिटलने रूग्णांना डिस्चार्ज देण्या अगोदर जमा करावी असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी आदेशात दिले आहेत. अशी माहिती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments