शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत

शहरातील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत 

वेब टीम नगर :  शहरात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे मंगळवारी शहरातील डॉक्टरांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती . काही हॉस्पिटलमध्ये तर अगदी५-६तास पुरेल एवढंच ऑक्सिजन साठा शिल्लक होता.

शहरातील खाजगी हॉस्पिटलचा ऑक्सिजन कमी होत असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची काळजी वाढली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने तात्काळ हालचाली करत शहरासाठी ऑक्सिजन उपलब्ध केला. रात्री ११ च्या सुमारास शहरात २९ मेट्रिक टन ऑक्सिजन दाखल झाला. उपलब्ध झालेला ऑक्सिजन निवासी जिल्हाधिकारी यांच्या नियोजनानुसार जिल्हा रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये वितरित करण्यात आला आहे .

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता सध्या ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. सध्या २९ मेट्रिक टन उपलब्ध उद्यापासून ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसलेयांनी सांगितले आहे

Post a Comment

0 Comments