तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार

 तरुणीचे अपहरण करून सामूहिक अत्याचार 

वेब टीम हिसार: हरयाणाच्या हिसारमधील एका गावातील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली. अपहरण केल्यानंतर आरोपींनी तिला एका हॉटेलवर नेले. तिथे सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

हिसार पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडित तरुणी २३ फेब्रुवारी रोजी आपल्या गावातून सायकलवरून निघाली होती. त्याचवेळी चार जणांनी तिचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तरुणीला फतेहाबाद येथे नेले. त्यानंतर एका हॉटेलवर घेऊन गेले. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.

पीडित तरुणीने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर हिसारला आली. कुटुंबीयांना घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांसोबत ती पोलीस ठाण्यात आली. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. तपास सुरू केला आहे. अपहरण करणाऱ्या तरुणांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतल्यानंतर ती एका कॉलेजात गेली. तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. कुटुंबीय तिथे आले आणि सोबत घेऊन गेले. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments