दिलासादायक बातमी जिल्हा लवकरच कोरोनावार मात करणार

दिलासादायक बातमी जिल्हा लवकरच कोरोनावार मात करणार 

वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा वाढत्या कमानीच्या आकड्यांनंतर आज मोठाच दिलासा मिळाला असून आज कोरोना बाधितांची २८६६ म्हणजे तब्बल १ हजाराने खाली आला आहे. संख्येत जर अशीच घट होत राहिली तर नगर जिल्हावासी  आगामी काही  दिवसातच कोरोनावर मात केल्याशिवाय राहणार नाहीत . 

विशाखापट्टणम हुन नगरला आलेल्या ऑक्सिजनच्या टँकर्स ने काय ऑक्सिजनचा तुटवडा काहीसा कमी झाला.आता ह्या पुढील काळात बेड ची होणारी कमतरता,रेमडीसिवीर च्या इंजेक्शनच्या तुटवड्याची दाहकता काही अंशी कमी होणार आहे. अर्थात या सगळ्यासाठी आणखीन काही दिवसांचा कालावधी जावा लागेल. मात्र जिल्हा वासी कोरोनावर मात करणारच असा विश्वास निर्माण करणारा आकडा आल्याने प्रशासनाचा हुरूप हि वाढला असणार यात शंका नाही .      

 अहमदनगर शहरात - ४६९, तर राहता - १५९,संगमनेर-३९२, श्रीरामपूर - १०१ , नेवासे -१२४, नगर तालुका-१५७,पाथर्डी-१२६,अकोले-२७७,कोपरगाव - ७२, कर्जत - १८३, पारनेर - १२६, राहुरी - १२०, भिंगार शहर - ७२ , शेवगाव - २३४,जामखेड - १००, श्रीगोंदे - ११५, मिलिट्री हॉस्पिटल - १२, इतर जिल्ह्यातील - २६, इतर राज्यातील - ०१ अशी २८६६ बाधितांची आजची आकडेवारी आहे. 

काल कोरोना मुक्त झालेल्यांची संख्या ३५५३ व मृत्यू पावलेल्यांची संख्या ३९ इतकी आहे .  

Post a Comment

0 Comments