३७८० कोरोना बाधितांची आज नोंद , रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या बाबतीत काहीसा दिलासा

३७८० कोरोना बाधितांची आज नोंद , रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनच्या बाबतीत काहीसा दिलासा   

वेब टीम नगर : जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कोरोना बाधितांच्या कालच्या ३७९० या विक्रमी आकड्यानंतर आज पुन्हा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ३७८०  आल्याने जिल्ह्याची परिस्थिती हि चिंताजनकच म्हणावी लागेल. 

त्यातल्यात्यात खासदार सुजय विखेंनी खास विमानाने आणलेले रेमडेसिवीरचे १० हजार इंजेक्शन्स आणि विशाखापट्टणम हुन संगमनेरला आलेल्या ऑक्सिजनच्या टँकर्स ने काय ऑक्सिजनचा तुटवडा काहीसा कमी झाला ह्याच काय त्या दिलासादायक गोष्टी दिसत असून लसींचातुटवडा बेड्सची कमतरता या आता नित्याच्या बाबी झाल्या आहेत. आज जिल्ह्यात नगर शहरात कोरोना बाधितांची विक्रमी नोंद झाली आहे. आज नगर मध्ये ९७० बाधितांची तर नगर तालुक्यात ३७६ बाधितांची नोंद झाली आहे.      

 अहमदनगर शहरात - ९७०, तर राहता - ३०७,संगमनेर - २९७, श्रीरामपूर - १५८ , नेवासे -२४६, नगर तालुका -३७६,पाथर्डी-१०८,अकोले - ११५,कोपरगाव - १५१, कर्जत - १३७, पारनेर - १८५, राहुरी - १८३, भिंगार शहर - ७९ , शेवगाव - १९३,जामखेड - १३८, श्रीगोंदे - १५५, मिलिट्री हॉस्पिटल - ८, इतर जिल्ह्यातील - २७, इतर राज्यातील - ०१ अशी आजची आकडेवारी आहे. अर्थात काळ बरे झालेल्या रुग्णांची आकडे वारीही बरी आहे.  

Post a Comment

0 Comments