निमगाव वाघात कोरोना प्रतिबंधासाठी औषधाची फवारणी

निमगाव वाघात कोरोना प्रतिबंधासाठी औषधाची फवारणी

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी व लसीकरणाबद्दल ग्रामस्थांमध्ये जनजागृती

वेब टीम नगर : कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे झपाट्याने संक्रमण वाढत असताना हे संक्रमण रोखण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे गावात व वाड्या-वस्तीवर जाऊन औषधाची फवारणी करण्यात आली. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामस्थांमध्ये मास्क वापरणे, गर्दी न करणे, विनाकारण घरा बाहेर न पडणे, आजाराची लक्षणे दिसताच तपासणी करणे व लसीकरण करुन घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली.  

गावात कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी खबरदारी म्हणून निमगाव वाघा ग्रामपंचायतच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, डॉ. विजय जाधव, पै.अनिल डोंगरे, आरोग्य अधिकारी सचिन कळमकर, संभाजी पाचारणे, पिंटू जाधव, ग्रामसेवक गोवर्धन राठोड, अंकुश आतकर, आरोग्य सेवक निलेश हराळ, सलीमा पठाण, रेखा ठोंबरे, कामगार तलाठी प्रमोद गायकवाड आदी उपस्थित होते.

पै. नाना डोंगरे म्हणाले की, शासनाच्या मार्गदर्शक तत्व व नियमांचे पालन करण्यासाठी ग्रामस्थांना सुचना करण्यात आल्या आहेत. गावासह वाडी, वस्त्यांवर निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी करुन कोरोना संदर्भात जनजागृती सुरु आहे. गावातील मेडिकल, अन्नधान्य पुरवठा केंद्र, किराणा दुकान येथे सामाजिक अंतर ठेवण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे. तर नागरिक देखील सुचनांचे पालन करुन प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य अधिकारी सचिन कळमकर यांनी ग्रामस्थांना आजाराची लक्षणे दिसल्यास तातडीने चाचणी करुन घेण्याचे व कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी भरती होण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी सरपंच रुपाली जाधव व उपसरपंच अलका गायकवाड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.(फोटो-डीएससी ८५७१)

Post a Comment

0 Comments