किराणा दुकानदारांनी भावफलक लावावेत : ॲड. सुरेश लगड

किराणा दुकानदारांनी भावफलक लावावेत : ॲड. सुरेश लगड

वेब टीम नगर : सध्या कोरोना  महामारीची दुसरी लाट गंभीर असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे सर्व सामान्य माणुस  शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे.त्यात आता आपण भाजीपाला व किराणा घेण्यासाठी सकाळी ७ते११ची वेळ निर्धारित केलेली आहे.हे फार चांगले झाले.मात्र या अल्प वेळेचा किराणा दुकानदारांनी गैरफायदा घेऊन चढ्या भावाने किराणा माल विकु नये म्हणून किराणा दुकानासमोर दर्शनी भागात किराणा मालाचा रास्त भाव दर्शवणारा फलक लावणे आवश्यक आहे.

अन्यथा या कोरोनाचे  या बिकट परिस्थितीत विनाकारण ग्राहकांची अव्वाचे सव्वा लुट व्हायला नको म्हणून आपण आपल्या जिल्ह्यातील सर्व किराणा दुकानदारांना शासनाने निर्धारित केलेल्या रास्त भावाचा फलक दुकानाचे दर्शनी भागात लावणेबाबत आदेशीत करावे अशी माझी आम नगरकरांचे वतीने विनंती वजा मागणी आहे.तसेच सध्या भाजीपाला विक्रेतेही त्यांचा भाजीपाला अव्वाच्या सव्वा चढ्या भावाने विकत आहे.यावर देखील आपल्या अधिपत्याखाली पुरवठा अधिकारी यांनी नियंत्रण ठेवण्यासाठी टिम नियुक्त करावी ही विनंती.

ॲड. सुरेश लगड विधीज्ञ अहमदनगर 

मो नं ८६६८३२४१८३ व ९४२३७९३५३५

Post a Comment

0 Comments