भाळवणीमध्ये तातडीने जंतुनाशकांची फवारणी करा

भाळवणीमध्ये तातडीने जंतुनाशकांची फवारणी करा 

प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांच्याकडे मागणी 

वेब टीम पारनेर : कोरोना महामारीची दुसरी लाट हि अत्यन्त भयानक पसरली असताना अहमदनगर शहरात आज ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. संपूर्ण महाराष्ट्राची रेमेडिसिवीर इंजेकशनची परिस्थिती आणि ऑक्सिजनचा अपुरा असणारा साठा आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्ण संख्या अशी भयानक परिस्थितीत काही चांगले कार्यहि होत आहेत आणि यामध्ये आपल्या भाळवणी शहरात उभा राहिलेला तरुण तडफदार कार्यशील कर्तबगार कोविडचा महायोद्धा आमदार नीलेश लंके यांच्या अथक प्रयत्नाने सुरु करण्यात आलेले शरद पवार आरोग्य मंदिर जम्बो कोविड सेंटर रुग्णांना खूप मोठा आधार बनला आहे परंतु एवढा मोठा कोविड सेंटर आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्ण संख्या आणि भाळवणी येथील कोविड सेंटर मध्ये मोठया प्रमाणात लोकांची वर्दळ वाढली असून या वाढलेल्या गर्दी मुळे भाळवणीतील जनसामान्य,ज्येष्ठ नागरिक,लहान मुले महिलांचे आरोग्य धोक्यात आल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण भाळवणी शहरात जन्तुनाशक औषध फवारणी प्रशासनामार्फत तातडीने करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर आणि अभिजित रोहोकले यांनी सुधाकर भोसले उपविभागिय अधिकारी,पारनेर-श्रीगोंदा भाग यांचे कडे मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments