सलग दुसर्यादिवशीही दिलासा : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट

सलग दुसर्यादिवशीही दिलासा : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट 

वेब टीम नगर : जिल्ह्यात लागू केलेल्या १४ दिवसांच्या जनता कर्फ्यूची जिल्हा पोलिस प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या कडक अंमलबजावणीमुळे कोरोनाबधिताच्या रुग्ण संख्येत सकारात्मक बदल दिसून येत आहे.मागच्या काही दिवसापासून सलग तीन हजार पेक्षा जास्त कोरोनाबाधीत रुग्ण जिल्ह्यात आढळून येत होते. मात्र सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाबांधीताच्या रुग्ण संख्येत घट दिसून आली आहे. जिल्ह्यात मागच्या चोवीस तासात २ हजार ७९५ नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.

या २ हजार ७९५ कोरोनाबधिताच्या रुग्ण संख्येत अहमदनगर शहरात ६५० नगर ग्रामीण भागात२८२, श्रीरामपूर२२९, राहाता२१६ , नेवासा १८४ ,कर्जत १६०, राहुरी १९८, पारनेर १४५, संगमनेर १३९ ,कोपरगाव ११५, शेवगाव १०८ ,श्रीगोंदा १०५, पाथर्डी ९४ ,अकोला ९०, इतर जिल्ह्यांमधील १७, जामखेड २७ ,भिंगार कँटोन्मेंट २१तर परराज्यातील १ बाधितांच्या समावेश आहे.

Post a Comment

0 Comments