दिलासा दायक: कोरोना बाधितांच्या संख्येत अंशतः घट

दिलासा दायक: कोरोना बाधितांच्या संख्येत अंशतः घट 

वेब टीम नगर : गेले काही दिवस कोरोना बाधितांचा आकडा चढत्या कमानीचा असतांना आज मात्र त्यात जवळपास ३५० बाधितांची घट होऊन आज ३२२९ बाधितांची नोंद झाली आहे.

यात अहमदनगर शहरात - ७४२,राहता - २०७ ,संगमनेर - २९६ ,श्रीरामपूर - ११४ , नेवासे -११३, नगर तालुका -२५५ ,पाथर्डी-९०,अकोले - १९९,कोपरगाव - १८२, कर्जत - २१३, पारनेर - १३५, राहुरी - १०४, भिंगार शहर - १२६ , शेवगाव - २१३,जामखेड - ४५, श्रीगोंदे - १२२, मिलिट्री हॉस्पिटल - २३, इतर जिल्ह्यातील - ५० अशी एकूण ३२२९ बाधितांची आजची संख्या आहे. 

शासकीय तंत्र निकेतन मध्ये १५० बेड्सचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ काहीशी कमी झाली आहे.   

Post a Comment

0 Comments