बबनराव पाचपुतेंचे हसन मुश्रीफांना निवेदन

बबनराव पाचपुतेंचे हसन मुश्रीफांना निवेदन 



वेब टीम श्रीगोंदा : राज्यामध्ये कोविड – १९ चा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेले काही रुग्ण बिनधास्त पणे फिरत असल्याचे निदर्शनास येत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी व इतर नागरिक बाधित होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची नावे जाहीर करण्यात यावीत अशी मागणी आमदार बबनराव पाचपुते यांनी केली आहे.

या मागणीचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविले. तर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ही मागणी केली.या निवेदनात पाचपुते यांनी म्हटले आहे की, “कोरोना ला रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवर कार्य करत आहे. पॉझिटिव्ह येणारे नागरिक यांची माहिती आरोग्य व महसूल विभागाकडे असते. यामुळे रुग्ण परिसरात बिनधास्त स्वरूपात सुपर स्प्रेडर होऊन फिरत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह नसल्याचे सांगत आहेत.

 मंत्री, आमदार, खासदार, उद्योगपती, अभिनेते स्वतःची नावे जाहीर करून संपर्कात येणाऱ्यांना सुपर स्प्रेडर होण्यापासून रोखत आहेत. सामान्य नागरिक जर कोरोना पॉझिटिव्ह झाला असेल तर, आरोग्य व महसूल यंत्रणेने आपल्या हद्दीतील सर्व यंत्रणांना उदाहरणार्थ ग्रामपंचायत, नगरपालिका व नागरिकांना नावे प्रसारित करावी, जेणेकरून हे रुग्ण इतरांना बाधित करणार नाहीत. कोरोनाला काही प्रमाणात रोखता येवू शकते, असे निवेदनात म्हटले आहे.



Post a Comment

0 Comments