हिवरगाव पावसा टोल नाक्यावर ८६लाख ४७ हजारांची दारू जप्त

हिवरगाव पावसा टोल  नाक्यावर ८६लाख ४७ हजारांची दारू जप्त 

वेब टीम नगर : हिवरगाव पावसा टोल नाक्यावर पुणे नाशिक महामार्गावर मौजे हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सापळा रचून गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस मनाई  असणाऱ्या विदेशी मद्याची वाहतूक करताना एक दहा टायर टाटा कंपनीचा २५१८ ट्रक पकडण्यात आला सदर गुन्ह्यात रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या  ७५० मी. ली लि  क्षमतेच्या ११३७ सीलबंद बाटल्या ,आराबेला व्होडकाच्या च्या ७५०मिली क्षमतेच्या२९७ सीलबंद बाटल्या व याच व्होडकाच्या १८० मी.ली च्या ११०४ सीलबंद बाटल्या, किंग फिशर स्ट्रॉंग बियर५०० मिली क्षमतेचे  ५५२ सीलबंद टीन , एक इंटेक्स कंपनीचा मोबाईल इतर साहित्य असे मिळून ८६ लाख ४७ हजार५२० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्यात भारत सिंग बापूलाल प्रजापती वय ३२ वर्ष राहणार गादिया मेर खिलचीपुर जिल्हा राज्य मध्य प्रदेश अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार आहेत . 

या कारवाईत  राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील नगर उपाधीक्षक एसएम सराफ आर डी वाजे निरीक्षक पाडळे निरीक्षक बिराजदार निरीक्षक यादव दुय्यम निरीक्षक दुय्यम निरीक्षक कडभाने डी.वाय.गोल्नेकर दुय्यम निरीक्षक ए.पी.बडदे, ए.आई तातळे ,विकास थोरात ,यांच्यासह जवान सर्वश्री ए एल मेंगाळ,टी आर शेख नेहाल उके ,दीपक बर्डे ,एस एम मुजमुले, एस डी साठे, बी जी थोरात, व्ही एम पाटोळे ,विजय हरिभाऊ मेहत्रे, एस आर अकोलकर, यांनी सहभाग नोंदवला

Post a Comment

0 Comments