आजपासून शहरात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू

आजपासून शहरात १४ दिवसांचा जनता कर्फ्यू 

वेब टीम नगर : संपूर्ण नगर जिल्ह्यात आजपासून(रविवार) पुढील चौदा दिवस कडक जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. नागरिकांनी नियम न पाळल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कोरोनाची परस्थिती हाताबाहेर जात असल्याने कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जनता कर्फ्यूचे आदेश जारी केले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील बाकी आस्थापना बंद असतील.

नगरमध्ये आजपासून चौदा दिवसांचा जनता कर्फ्यू लागूपरिस्थिती हाताबाहेर जात असल्याने निर्णय -जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आरोग्य यंत्रणांवर ताण पडत आहे. राज्यात लागू केलेले कडक निर्बंध नागरिक पाळत नसल्याने आता चौदा दिवसांच्या जनता कर्फ्यूचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जनता कर्फ्यूची कडक अंमलबाजवणी होणार असून नियम न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आणि पालिका प्रशासनाला दिल्या आहेत, असेही ते म्हणाले.

बंद करण्यात आलेल्या बाबी -

हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र, होम डिलेवरी सुरू राहील.धार्मिक स्थळे, आठवडे बाजार, भाजीपाला, फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.दारूची दुकाने पूर्णतः बंद राहतील, टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांसाठी वापरण्यास परवानगी आहे. चार चाकी खासगी वाहनांतून फक्त अत्यावश्यक सेवा देता येतील. दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेसाठी वापरता येतील. सर्व खासगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पूर्णतः बंद राहतील. शैक्षणिक संस्था, सर्व खासगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील, स्टेडिअम, मैदाने देखील बंद राहतील.विवाह समारंभांना बंदी घातली आहे.अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने, सिनेमा हॉल, नाट्यगृहे, सभागृह, संग्रहालये पूर्णतः बंद राहतील.सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम बंद राहतील.सर्व प्रकारची खासगी बांधकामे बंद राहतील. सेतू ई-सेवा केंद्र, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील, व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निग आणि इव्हिनींग वॉक बंद राहतील. बेकरी, मिठाईची दुकाने बंद राहतील. 

वेळेच्या निर्बंधासह सुरू असलेल्या बाबी -

किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 यावेळेत सुरू राहतील.दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री, भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण), फळे विक्री (फक्त व्दार वितरण), अंडी, मटन, चिकन, मत्स्य विक्री, कृषी संबंधीत सर्व सेवांची दुकाने, पशुखाद्य विक्री दुकाने.पेट्रोल पंपावर खासगी वाहनांसाठी पेट्रोल, डिझेल/सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी 7 ते 11 या वेळेत करता येईल.

Post a Comment

0 Comments